शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

Sangli: सातबाऱ्यावर नोंदीसाठी लाच घेणाऱ्या तलाठी, कोतवालास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 19:20 IST

मिरज : सातबारा उताऱ्यावर प्लॉटची नोंद करण्यासाठी अडीच हजार रुपये लाच घेणारे बेळंकी (ता. मिरज ) येथील तलाठी व ...

मिरज : सातबारा उताऱ्यावर प्लॉटची नोंद करण्यासाठी अडीच हजार रुपये लाच घेणारे बेळंकी (ता. मिरज) येथील तलाठी व कोतवालास सांगलीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. याप्रकरणी तलाठी विद्यासागर सदाशिव चव्हाण (वय ५०, रा. ब्राह्मणपुरी, मिरज) व कोतवाल राजाराम धनपाल वाघमारे (वय ५४, रा. बेळंकी, ता. मिरज) यांच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बेळंकी येथील तक्रारदाराच्या भावाने खरेदी केलेल्या प्लॉटची नोंद तलाठी विद्यासागर चव्हाण यांना सांगून मंजूर करण्यासाठी कोतवाल राजाराम वाघमारे यांनी स्वतः व तलाठी चव्हाण यांच्यासाठी अडीच हजार रुपयांची मागणी केल्याने सांगलीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने २ रोजी बेळंकीचे तलाठी विद्यासागर सदाशिव चव्हाण, कोतवाल राजाराम धनपाल वाघमारे यांच्याकडे पडताळणी केली. कोतवाल वाघमारे यांनी तक्रारदाराच्या भावाच्या प्लॉटची उताऱ्यावर नोंद घालण्यासाठी तलाठी व स्वतःसाठी अडीच हजार रुपये लाचेची मागणी केली. तलाठी विद्यासागर चव्हाण यांनी तक्रारदारास लाचेची रक्कम राजाराम वाघमारे यांना देण्यास सांगितले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दि. ३ जुलै रोजी बेळंकी तलाठी कार्यालयात सापळा रचून विद्यासागर सदाशिव चव्हाण यांना बेळंकीत त्यांच्या कार्यालयासमोर तक्रारदाराकडून अडीच हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

याबाबत तलाठी विद्यासागर सदाशिव चव्हाण व कोतवाल राजाराम धनपाल वाघमारे यांच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कटके, पोलिस निरीक्षक विनायक भिलारे, किशोर कुमार खाडे, पोलिस कर्मचारी ऋषिकेश बडणीकर, प्रीतम चौगुले, अजित पाटील, धनंजय खाडे, सलीम मकानदार, पोपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, सीमा माने, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, वीणा जाधव यांनी ही कारवाई केली.