तलाठ्याचे अपहरण व मारहाण करून वाळूचा ट्रक पळवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:28 IST2021-05-11T04:28:43+5:302021-05-11T04:28:43+5:30

तलाठी कावरे यांनी दि. ८ रोजी रात्री साडेनऊ वाजता बेळंकी-मिरज रस्त्यावर विनापरवाना वाळू वाहतूक करणारा ट्रक ...

Talatha was abducted and beaten and a sand truck was hijacked | तलाठ्याचे अपहरण व मारहाण करून वाळूचा ट्रक पळवला

तलाठ्याचे अपहरण व मारहाण करून वाळूचा ट्रक पळवला

तलाठी कावरे यांनी दि. ८ रोजी रात्री साडेनऊ वाजता बेळंकी-मिरज रस्त्यावर विनापरवाना वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला होता. पकडलेल्या ट्रकमध्ये बसून कावरे मिरजेत तहसील कार्यालयाकडे ट्रक घेऊन येत असताना चालकाने मिरजेऐवजी भरधाव वेगात ट्रक बेळंकीच्या दिशेने नेला. यावेळी दुचाकी व मोटारीतून काहीजण पाठलाग करीत ट्रकच्या मागून आले. दुचाकीवरून (क्र. एमएच १० डीबी ९५१७) आलेल्या दोघांनी ट्रक थांबवत कावरे यांना ट्रकमधून खाली उतरवून मारहाण केली. यावेळी कावरे यांचा चष्मा व मोबाइल काढून घेऊन कोणाला सांगितले तर बघून घेऊ, अशी धमकी दिली.

त्यानंतर कावरे यांना मोटारीत घालून एरंडोली येथे अधारात एका द्राक्षबागेत सोडून सर्वांनी वाळूचा ट्रक घेऊन पलायन केले. ५० हजार रुपये किमतीची पाच ब्रास वाळू, ४ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल, चष्मा व ट्रक असा ३ लाख ५४ हजार रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने चोरून शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल तलाठी कावरे यांनी ग्रामीण पोलिसात अज्ञाताविरुद्ध फिर्याद दिली आहे.

Web Title: Talatha was abducted and beaten and a sand truck was hijacked