बार्टीच्या समतादूतांना कायम शासकीय सेवेत घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:27 IST2021-07-30T04:27:51+5:302021-07-30T04:27:51+5:30

अजित पवार हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने तासगाव येथे भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. ...

Take Barty's envoys into permanent government service | बार्टीच्या समतादूतांना कायम शासकीय सेवेत घ्या

बार्टीच्या समतादूतांना कायम शासकीय सेवेत घ्या

अजित पवार हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने तासगाव येथे भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील उपस्थित होते.

शासनाच्या अनेक योजना तालुका स्तरावर पोहोचविण्याचे काम प्रकल्प अधिकारी व समतादूत यांच्यामुळे सोईस्कर झाले आहे. कोविड काळात महाराष्ट्रातील परराज्यात अडकलेले मजूर व कामगार तसेच परराज्यातील महाराष्ट्रात अडकलेले मजूर व कामगारांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी राबविलेल्या अभियानात समन्वयक म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. याचा विचार करून त्यांना शासनाने कायम सेवेत समावेश करून घ्यावे, अशी मागणी संदेश भंडारे यांनी केली.

यावेळी दलित महासंघाचे नेते तुकाराम सदाकळे, मुन्ना कोकणे, प्रवीण मोरे, तालुकाध्यक्ष प्रवीण धेंडे, राजू लोंढे, धोंडिराम कांबळे, आदी उपस्थित होते.

Web Title: Take Barty's envoys into permanent government service