आष्टा पालिकेची सभा ऑफलाईन घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:53 IST2020-12-11T04:53:46+5:302020-12-11T04:53:46+5:30

आष्टा : आष्टा नगरपरिषदेची १५ डिसेंबररोजी होणारी सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. ती ऑफलाईन घेण्यात यावी, अशी मागणी ...

Take the Ashta Palika meeting offline | आष्टा पालिकेची सभा ऑफलाईन घ्या

आष्टा पालिकेची सभा ऑफलाईन घ्या

आष्टा : आष्टा नगरपरिषदेची १५ डिसेंबररोजी होणारी सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. ती ऑफलाईन घेण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते वीर कुदळे व नगरसेविका सौ. वर्षा अवघडे यांनी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दहा महिन्यांपासून आष्टा पालिकेची सर्वसाधारण सभा झालेली नाही. कोरोनामुळे ती होऊ शकत नव्हती. लोकसभा, विधानसभेचे अधिवेशन तसेच कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या सर्वसाधारण सभा ऑफलाईन झाल्या आहेत. आष्टा पालिकेची येत्या १५ डिसेंबररोजी सर्वसाधारण सभा होत आहे. मात्र ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होण्याबाबतचा निर्णय चुकीचा आहे. या बैठकीत सुमारे ३२ विषय असून, अनेक धोरणात्मक निर्णयांबाबत सविस्तर चर्चा होणे अपेक्षित आहे. ऑनलाईन सभेमुळे नगरसेवकांना मत मांडताना मर्यादा पडत आहेत. शहरातील बेकायदेशीर बांधकामे, बेसुमार मोकाट डुकरे, कुत्री, आरोग्याची समस्या याबाबत असंतोष आहे. त्यामुळे पालिका सदस्यांची बैठक ऑफलाईन घेण्यात यावी.

फोटो १०१२२०२०-आष्टा पालिका न्यूज

: आष्टा पालिकेची सभा ऑफलाईन घेण्याबाबत मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना निवेदन देताना वीर कुदळे व सौ. वर्षा अवघडे.

Web Title: Take the Ashta Palika meeting offline