ताकारीच्या लुटारू टोळीला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:27 IST2021-01-25T04:27:32+5:302021-01-25T04:27:32+5:30

इस्लामपूर : ताकारी (ता. वाळवा) येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरात एका भंगार विक्रेत्याला चाकूचा धाक दाखवत १४ हजार रुपयांना लुटणाऱ्या ...

Takari's gang of robbers in police custody | ताकारीच्या लुटारू टोळीला पोलीस कोठडी

ताकारीच्या लुटारू टोळीला पोलीस कोठडी

इस्लामपूर : ताकारी (ता. वाळवा) येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरात एका भंगार विक्रेत्याला चाकूचा धाक दाखवत १४ हजार रुपयांना लुटणाऱ्या टोळीतील पाच जणांना येथील न्यायालयाने २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

ऋषिकेश विष्णू क्षीरसागर (१९), उमेश उत्तम कांबळे (२०), नीलेश राजू बामणे (२०, तिघेही रा. ताकारी), ओंकार हणमंत बोडरे (१९) आणि संदीप वीरसिंग जाधव (दोघेही रा. तुपारी, पलूस) अशी या पाच जणांची नावे आहेत.

याबाबत उमर अफझल मलिक (२४, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर, मूळ रा. खालेपार्क, मुझ्झफरनगर, उत्तरप्रदेश) या भंगार व्यावसायिकाने पोलिसात फिर्याद दिली आहे. या लुटारूनी ५ जानेवारीला आणखी एका भंगार व्यापाऱ्याला अशाच पद्धतीने २५ हजार रुपयांना लुटल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीचा छडा लावल्याने लुटमारीच्या आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Takari's gang of robbers in police custody