तडीपार गुन्हेगाराला कुपवाडमध्ये अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:33 IST2021-02-17T04:33:13+5:302021-02-17T04:33:13+5:30
सांगली : तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सूरज रमेश काळे (वय २३, रा. रेणुका मंदिरजवळ, कुपवाड) याला स्थानिक गुन्हे ...

तडीपार गुन्हेगाराला कुपवाडमध्ये अटक
सांगली : तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सूरज रमेश काळे (वय २३, रा. रेणुका मंदिरजवळ, कुपवाड) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणने अटक केली. कुपवाडमधील सोसायटी चौकात ही कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यातून तडीपार केलेले गुन्हेगार आदेशाचे भंग करून पुन्हा सांगलीत येत आहे. या गुन्हेगाराची माहिती घेऊन कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले. पथकातील कर्मचारी कुपवाड परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी सूरज काळे यास सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार केले असून, तो कुपवाड परिसरात फिरत असल्याची माहिती पथकास मिळाली. कुपवाड येथील सोसायटी चौकात सूरज काळे हा थांबला होता. त्याला पथकाने छापा टाकून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तो आल्याचे समोर आले. त्यानुसार कारवाई करण्यात आली.
फोटो : १६ सूरज काळे