‘स्वाभिमानी’चे तासगावातील आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:19 IST2021-06-21T04:19:10+5:302021-06-21T04:19:10+5:30

खराडे म्हणाले, रविवारी सांगली येथील विश्रामगृहात व्यवस्थापक आर. डी. पाटील, संजय बेले, जोतिराम जाधव, अशोक खाडे, दामाजी दुबळ, संदीप ...

Swabhimani's agitation in Tasgaon postponed | ‘स्वाभिमानी’चे तासगावातील आंदोलन स्थगित

‘स्वाभिमानी’चे तासगावातील आंदोलन स्थगित

खराडे म्हणाले, रविवारी सांगली येथील विश्रामगृहात व्यवस्थापक आर. डी. पाटील, संजय बेले, जोतिराम जाधव, अशोक खाडे, दामाजी दुबळ, संदीप शिरोटे, नागेश मोहिते, मानसिंग जाधव आदींची बैठक झाली. या बैठकीत सोमवारपासून बिले देण्यास सुरुवात करत असल्याची खात्री देण्यात आली. तयार केलेले चेक बैठकीत दाखविण्यात आले, तसेच उर्वरित सर्व शेतकऱ्यांची बिले देण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे सोमवारी होणारा मोर्चा स्थगित केला आहे. मात्र उर्वरित बिले ठरलेल्या वेळेत न दिल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मोबाइलवरून खासदार संजयकाका पाटील यांच्याशीही चर्चा केली. त्यांनी सर्वांची बिले येत्या पंधरा दिवसांत देण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. मात्र शब्द न पाळल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे.

Web Title: Swabhimani's agitation in Tasgaon postponed