दिल्लीतील आंदोलनासाठी स्वाभीमानी एक्सप्रेस मिरजेतून रवाना-तीन जिल्ह्यातील १२५० कार्यकर्त्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:10 PM2018-11-28T12:10:03+5:302018-11-28T12:25:19+5:30

शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, सातबारा कोरा करावा, उसाचा उतारा पूर्ववत ९.५ टक्के करावा यासह इतर मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या संसदेला घेराव आंदोलनात सहभागी होण्यासाठी बुधवारी कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील १२५० हून अधिक कार्यकर्ते विशेष रेल्वेने दिल्लीला रवाना

Swabhimani Express from Mirage for the Delhi Movement - 1250 workers from three districts participated | दिल्लीतील आंदोलनासाठी स्वाभीमानी एक्सप्रेस मिरजेतून रवाना-तीन जिल्ह्यातील १२५० कार्यकर्त्यांचा सहभाग

दिल्लीतील आंदोलनासाठी स्वाभीमानी एक्सप्रेस मिरजेतून रवाना-तीन जिल्ह्यातील १२५० कार्यकर्त्यांचा सहभाग

googlenewsNext
ठळक मुद्देस्वाभीमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन- ३० रोजी संसदेला घेराव या विशेष रेल्वेस १८ डबे असून १५ बोगी, २ जनरल डबे, १ भोजनाची व्यवस्था असलेला डबा आहे.

शरद जाधव--सांगली- आॅनलाईन लोकमत

सांगली : शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, सातबारा कोरा करावा, उसाचा उतारा पूर्ववत ९.५ टक्के करावा यासह इतर मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या संसदेला घेराव आंदोलनात सहभागी होण्यासाठी बुधवारी कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील १२५० हून अधिक कार्यकर्ते विशेष रेल्वेने दिल्लीला रवाना झाले. 
शुक्रवार दि. ३० व शनिवार दि. १डिसेंबर रोजी दिल्लीतील संसदेला शेतकºयांकडून घेराव घालण्यात येणार आहे. या आंदोलनात देशभरातील २१० संघटनांचा सहभाग असून स्वाभीमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.

बुधवारी सकाळी १० वाजता मिरज रेल्वे स्थानकावरून रवाना झाली. या विशेष रेल्वेस १८ डबे असून १५ बोगी, २ जनरल डबे, १ भोजनाची व्यवस्था असलेला डबा आहे.  ‘स्वाभीमानी एक्सप्रेस’ नावाने असलेल्या विशेष रेल्वेला मिरज रेल्वेस्थानकावर सावकार मादनाईक यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला.  यावेळी संदीप राजोबा, शिरोळ पंचायत समितीच्या माजी सभापती सुवर्णा अपराध, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे, शिरोळच्या माजी पंचायत समिती सदस्या प्रमिला पाटील, वैभव कांबळे, आदीनाथ हिंगमिरे, विठ्ठल मोरे, सागर शंभूशेटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 राजू शेट्टी जिंदाबाद, स्वाभिमानी जिंदाबाद अशा घोषणांबरोबरच आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत अशा घोषणा देत उत्साही वातावरणात विशेष स्वतंत्र रेल्वेतून कार्यकर्ते व शेतकही संसदेकडे रवाना झाले. यावेळी काही उत्साही कार्यकर्त्यांनी जल्लोषात हल्लगी वाजवित, झेंडे फडकावित, टाळ मृदुगांचा गजर करीत मिरजेतील रेल्वे स्थानकात प्रवेश केला. यामुळे संपूर्ण रेल्वे स्थनकातील अन्य प्रवाशांचे या आंदोलनाकडे लक्ष वेधले गेले. 

Web Title: Swabhimani Express from Mirage for the Delhi Movement - 1250 workers from three districts participated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.