शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव कारखान्याच्या एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 18:27 IST

Swabimani Shetkari Sanghatna Sangli- तासगाव साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 2850 रुपये एकरकमी एफआरपी द्यावी अशी आक्रमक भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली. कारखाना प्रशासनानें अन्य कारखान्यांच्या बरोबरीने निर्णय घेणार असल्याची भूमिका घेतली. मात्र मागणी मान्य न झाल्यास स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला.

ठळक मुद्देतासगाव कारखान्याच्या एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी आक्रमक बैठक निष्फळ : मागणी मान्य न केल्यास स्वाभिमानी स्टाईलने आंदोलनाचा इशारा

तासगाव : तासगाव साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 2850 रुपये एकरकमी एफआरपी द्यावी अशी आक्रमक भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली. कारखाना प्रशासनानें अन्य कारखान्यांच्या बरोबरीने निर्णय घेणार असल्याची भूमिका घेतली. मात्र मागणी मान्य न झाल्यास स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला.पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत यांच्या उपस्थितीत तासगाव पोलीस ठाण्यात, तासगाव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर डी पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची समन्वयाबाबत बैठक झाली. मात्र या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले.संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी शेतकऱ्यांना 2850 रुपये याप्रमाणे एकरकमी एफआरपी देण्याची आक्रमक भूमिका घेतली. कारखाना प्रशासनाने कोणतेही कारण न देता शेतकऱ्यांची बांधिलकी ठेवून शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घ्यायला हवी. सोनहिरा, उदगीर, दालमिया या कारखाने शेतकऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तासगाव कारखान्यांनी ही एकरकमी एफआरपी द्यायलाच हवी अशी भूमिका घेतली. कारखान्याचे कार्यकारी संचालक आर डी पाटील यांनी अन्य कारखान्यांच्या प्रमाणे तासगाव कारखाना ही निर्णय घेऊन शेतकरी हिताचा निर्णय घेईल अशी भूमिका घेतली.

कारखान्याकडून एकरकमी एफआरपी देण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका जाहीर न केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. एकरकमी एफआरपी न मिळाल्यास स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन करून शेतकऱ्यांचे हित साधले जाईल, असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष जोतीराम जाधव यांनी यावेळी दिला. बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ झाली.पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी कायदा व सुव्यवस्था राखून शेतकऱ्यांचे हित साधले जावे असे आवाहन केले. बैठकीस दामाजी डुबल ,धन्यकुमार पाटील ,सुधीर जाधव ,संदेश पाटील शशिकांत माने, माणिक शिरोटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते

 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSangliसांगलीtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळSugar factoryसाखर कारखाने