शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

Sangli: कोळगिरीतील तरुणाचा संशयास्पद मृत्यू, नातेवाइकांकडून घातपाताचा संशय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 13:18 IST

शनिवारी सायंकाळी घरातून बाहेर पडला. त्यानंतर तो घरी नाही परतला

उमदी : जत तालुक्यातील कोळगिरी येथील शिवाजी बिराप्पा डिस्कळ (वय ३३) याचा मृतदेह अंकलगी (ता. जत) येथील मल्लाप्पा तेली यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला आहे. उमदी पोलिसात याबाबत नोंद झाली आहे. नातेवाइकांनी शिवाजी याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, शिवाजी डिस्कळ हा शनिवारी सायंकाळी घरातून बाहेर पडला होता. तो कुणाच्या तरी दुचाकीवरून जाताना नागरिकांनी बघितले होते. त्यानंतर तो घरी परतला नाही. त्यामुळे घरातील लोकांनी त्याच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु मोबाईल लागला नाही. घरच्या लोकांनी रात्रभर त्याची चौकशी केली. त्यानंतर रविवारी त्याचा शोध सुरू असताना दुपारी त्याचा मृतदेह विहिरीत सापडल्याची बातमी गावात पसरली.उमदी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृत शिवाजी याच्या डोक्याला डाव्या बाजूस गंभीर दुखापत झाली आहे. तसेच विहिरीत केवळ गुडघाभर पाणी होते. त्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला नसून खून करण्यात आला असावा, असा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. उमदी पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर जत ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. सायंकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.शिवाजी याला मारहाण करून मृतदेह विहिरीत टाकण्यात आल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. रात्री उशिरा याप्रकरणी गुड्डापूर येथील एका संशयितास उमदी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती होती. मात्र पोलिसांनी याला दुजोरा दिला नाही. याबाबत पोलिस नाईक बन्नेनावर तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस