शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: उटगी येथील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, खुनाचा संशय 

By घनशाम नवाथे | Updated: April 20, 2024 11:34 IST

उमदी : जत तालुक्यातील उटगी येथील येथील विवाहिता चन्नाक्का महांतेश कोळगिरी (वय २०) हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. खून ...

उमदी : जत तालुक्यातील उटगी येथील येथील विवाहिता चन्नाक्का महांतेश कोळगिरी (वय २०) हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. खून की आत्महत्या याबाबत नागरिकांमधून उलट सुलट चर्चा सुरू आहे. तिचा पती महांतेश शिवाप्पा कोळगीरी याच्यावर नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. उमदी पोलिस याचा कसून तपास करत आहेत.पोलिसांनी दिलेली व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, चन्नाका हिचा पती महांतेश हा व्यसनाधीन  झाला आहे. त्याचे पहिले लग्न जत तालुक्यातील सोन्याळ येथील एका महिलेशी झाले होते. तिलाही मारहाण करून तिचा पाय मोडला होता. त्यानंतर दोन्ही कुंटुबात वाद होऊन सोन्याळच्या महिलेने सोडचिठ्ठी घेतली होती. त्यानंतर सहा महिन्यांनी कर्नाटकातील ख्याडगी (ता. इंडी  जि. विजयपुर) येथील चन्नाका या महिलेशी वर्षभरापूर्वी विवाह झाला होता.जत तालुक्यातील पुर्व भागातील एका महिलेशी त्याचे प्रेम संबंध असल्याचा संशय होता. यावरुन शुक्रवारी मध्यरात्री दोघांच्यात वादावादी झाली. त्यानंतर चन्नाकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवारी उघडकीस आले. परंतू तिचा गळा दाबून खून करून गळफास घेतल्याचे दाखविण्यात आल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान घटनेनंतर उमदी पोलिसानी घटनास्थळी पंचनामा करून पहाटे जत येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आणला. मुलीचे नातेवाईक येणार असल्याने शवविच्छेदनाचे काम थांबविण्यात आले. सकाळी दहा वाजल्यानंतर मुलीचे नातेवाईक जत ग्रामीण रूग्णालयात आले. त्यानंतर हंबरडा फोडला. त्यामुळे ग्रामीण रूग्णालयात गर्दी झाली होती. नातेवाईकांच्या आरोपानुसार पोलिस तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस