सांगली : पत्नीकडे वाकड्या नजरेने बघून छेड काढल्याच्या रागातून मित्राचा खून करून पसार झालेल्या प्रेमकुमार पवनकुमार बराला (वय २१, रा. जेतूसरा, ता. श्रीमाधवपूर, जि. सिकर, राजस्थान) याला संजयनगर पोलिसांनी गोव्यातून अटक केली.प्रेमकुमार बराला याने राजस्थानमध्ये वास्तव्यास असताना एका तरुणीशी प्रेमप्रकरण जुळल्यानंतर तिच्याशी आंतरजातीय विवाह केला. विवाहानंतर कामधंदा करण्यासाठी तो सांगलीत राहणाऱ्या कामगार गोपालसिंह बेगाराम भदाला याच्याकडे आला. गोपालसिंहच्या शेजारी त्याने भाड्याने खोली घेतली. गोपालसिंह प्रेमकुमारच्या पत्नीकडे वाकड्या नजरेने पाहत होता. प्रेमकुमार नसताना त्याने तिची छेड काढली होती.तिने हा प्रकार प्रेमकुमारला सांगितल्यानंतर त्याने दि. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास रागाच्या भरात खोऱ्याच्या प्लास्टिकच्या दांड्याने गोपालसिंहला मारून खून केला. त्यानंतर तो पत्नीसह पळाला.संजयनगर पोलिसांना हा प्रकार समजल्यानंतर तातडीने एक पथक राजस्थानकडे रवाना करण्यात आले, तसेच एक पथक स्थानिक परिसरात माग काढत होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपासातून मिरज बसस्थानकापर्यंत त्याचा शेवटचा ठावठिकाणा समजला. त्यानंतर त्याचा माग काढणे कठीण बनले होते.संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे उपनिरीक्षक जोतिबा भोसले, अंमलदार कपिल साळुंखे, सुशांत लोंढे यांनी तांत्रिक तपासातून तसेच गोपनीय बातमीदारामार्फत संशयित प्रेमकुमार हा गोवा राज्यातील पिरना गावात लपून बसल्याची माहिती मिळवली. त्यानंतर तत्काळ पथकाने तेथे जाऊन प्रेमकुमारला अटक केली. त्याला सांगलीत आणले. निरीक्षक कदम तपास करत आहेत.मोबाइल वापरत नसताना शोधलेसंशयित प्रेमकुमार हा परराज्यातील असून त्याने मोबाइल वापरणे बंद केल्यामुळे ठावठिकाणा शोधण्याचे आव्हान होते. त्याची पत्नी संपर्कासाठी मोबइल ॲप वापरत होती. त्यावरून पोलिस त्यांच्या मागावर होते. अखेर ठावठिकाणा समजल्यानंतर तत्काळ जाऊन अटक केली.
Web Summary : A man was arrested in Goa for murdering his friend in Sangli after the friend harassed his wife. The suspect evaded capture by ceasing mobile phone use, making location difficult. Police tracked him down via app usage.
Web Summary : सांगली में एक व्यक्ति ने अपने दोस्त की हत्या कर दी क्योंकि उसने उसकी पत्नी को परेशान किया था। आरोपी मोबाइल फोन का उपयोग बंद करके गिरफ्तारी से बच गया, जिससे उसका पता लगाना मुश्किल हो गया। पुलिस ने ऐप के इस्तेमाल से उसे ट्रैक किया।