शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

फलटण-सांगली मार्गाचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 6:11 PM

फलटण ते मिरज या नव्या लोहमार्गाचे सर्वेक्षण रेल्वे बोर्डाने सुरू केले आहे. हा मार्ग दहीवडी-विटा-तासगाव व सांगली असा प्रस्तावित आहे. प्राथमिक सर्वेक्षणासाठी ३७ लाखांची तरतूद केली आहे. सर्वेक्षणातून प्रवासी भारमान आणि अभियांत्रिकी कामाच्या खर्चाचा अंदाज घेतला जाईल.

ठळक मुद्देफलटण-सांगली मार्गाचे सर्वेक्षणप्राथमिक सर्वेक्षणासाठी ३७ लाखांची तरतूद

सांगली : फलटण ते मिरज या नव्या लोहमार्गाचे सर्वेक्षण रेल्वे बोर्डाने सुरू केले आहे. हा मार्ग दहीवडी-विटा-तासगाव व सांगली असा प्रस्तावित आहे. प्राथमिक सर्वेक्षणासाठी ३७ लाखांची तरतूद केली आहे. सर्वेक्षणातून प्रवासी भारमान आणि अभियांत्रिकी कामाच्या खर्चाचा अंदाज घेतला जाईल.यानिमित्ताने जिल्ह्यात आणखी एक लोहमार्ग उपलब्ध होणार आहे. सध्या मिरजेतून पुणे, बेळगाव, पंढरपूर व कोल्हापूर असे चार लोहमार्ग जातात. नव्या लोहमार्गामुळे विटा-तासगाव हा भाग रेल्वेच्या जाळ्यात येईल. या भागातील प्रवाशांना पुणे-मुंबईसह विदर्भ-मराठवाडा व कर्नाटकात जाण्यासाठी थेट रेल्वे उपलब्ध होणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वेक्षणासाठी तरतूद करण्यात आली होती, त्यानुसार प्रत्यक्ष कार्यवाही सुरु झाली आहे. फलटण-मिरज हा प्रस्तावित लोहमार्ग १५० किलोमीटर लांबीचा आहे. तो सांगलीत मुख्य मार्गाला जोडला जाईल.

यानिमित्ताने सांगलीदेखील जंक्शन म्हणून पुढे येईल. नव्या मार्गासाठी संपादित करावी लागणारी बहुतांश जमीन माळरान स्वरुपाची असल्याने हा मार्ग कमी खर्चात होईल. भूसंपादनासाठी शेतकऱ्यांचा विरोधही फारसा होणार नाही, अशी अपेक्षा आहे.रेल्वेच्या सर्वेक्षणात प्रवासी भारमान अत्यंत महत्त्वाचे ठरते. या मार्गावरुन पुरेसा प्रवासी वर्ग मिळण्याची हमी असेल, तर मंजुरीचा विचार रेल्वे मंडळाकडून होईल. तसेच मालवाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचाही अंदाज घेतला जाईल.

टॅग्स :railwayरेल्वेSangliसांगली