कुपवाडमध्ये उद्यापासून सूरज फिडे बुद्धिबळ स्पर्धा
By Admin | Updated: December 23, 2014 23:40 IST2014-12-23T23:37:21+5:302014-12-23T23:40:32+5:30
स्पर्धेचे हे बारावे वर्ष आहे. या स्पर्धा सतत सुरू राहणार आहेत. एकूण दोन लाख रुपयांची पारितोषिके

कुपवाडमध्ये उद्यापासून सूरज फिडे बुद्धिबळ स्पर्धा
कुपवाड : नूतन बुद्धिबळ मंडळ आणि सूरज स्पोर्टस् अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सूरज आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धा गुरुवार, दि. २५ ते २९ डिसेंबरअखेर घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा कुपवाड एमआयडीसीमधील कृष्णा व्हॅली बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहेत, अशी माहिती बुद्धिबळ मंडळाचे सचिव चिंतामणी लिमये व सूरज फौंडेशनचे सचिव एन. जी. कामत यांनी पत्रकार बैठकीत दिली. कामत व लिमये यावेळी म्हणाले की, स्पर्धेचे हे बारावे वर्ष आहे. या स्पर्धा सतत सुरू राहणार आहेत. एकूण दोन लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेमध्ये चंद्रशेखर गोखले, मिताली पाटील, समीर कठमाळे, अक्षत संपारीया, अरविंद शास्त्री यांच्यासह इतरही नामांकित फिडेमास्टर सहभागी होणार आहेत. आतापर्यंत दीडशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. खेळाडूंना सवलतीही जाहीर करण्यात आल्या आहेत. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत, उद्योगपती प्रवीणचंद्र लुंकड, प्रमोद चौगुले, बुद्धिबळ मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ शिरगावकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. (वार्ताहर)
उद्योगपती सचिन शिरगावकर यांच्याहस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी नूतन बुध्दिबळ मंडळाचे चिदंबर कोटिभास्कर, किशोर पटवर्धन, सूरज फौंडेशनचे टी. एन. कृष्णमूर्ती, हरिभाऊ साळुंखे, विनायक जोशी यांच्यासह इतर पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. (वार्ताहर)