दुधगावला कारभाराऱ्यांकडुन रुग्णांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:26 IST2021-05-08T04:26:39+5:302021-05-08T04:26:39+5:30

कोरोनाच्या पाश्वभूमीवर लोकांना आधार देण्यासाठी व त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी सरपंच विकास कदम, ग्रामपंचायत सदस्य विलास गावडे, नीलेश ...

Support to patients from Dudhgaon stewards | दुधगावला कारभाराऱ्यांकडुन रुग्णांना आधार

दुधगावला कारभाराऱ्यांकडुन रुग्णांना आधार

कोरोनाच्या पाश्वभूमीवर लोकांना आधार देण्यासाठी व त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी सरपंच विकास कदम, ग्रामपंचायत सदस्य विलास गावडे, नीलेश हेरवाडे, सतीश कांबळे, ग्रामविकास अधिकारी बसगोंडा पाटील, तलाठी रुपनर, पोलीसपाटील दिलीप कुंभार, ग्रामपंचायत कर्मचारी दीपक कुंभार, भरत लांडे, सुरज संदे, स्वप्नील माळी यांनी भाऊसाहेब कुदळे विद्यालयामध्ये संस्था विलगीकरणामध्ये असणाऱ्या रुग्णांची भेट घेतली. आशा वर्कर व आरोग्य सेवक यांच्यामार्फत रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन केले व त्यांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.

तसेच दुधगावमधील माजी सैनिकांचे पथक गावामध्ये विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या लोकांना घरी बसण्याच्या सूचना देत आहेत. तसेच सकाळी व सायंकाळी दुचाकीवरून चौकात थांबलेल्या नागरिकांना एकत्र न थांबण्याचे आवाहन करीत आहेत.

Web Title: Support to patients from Dudhgaon stewards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.