शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भारताला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी मोदींना साथ द्या, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 13:01 IST

७० वर्षांच्या काळात विकासापेक्षा राजकारण जास्त झाले

इस्लामपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना केंद्रातून आलेल्या सर्व योजना ठप्प होत्या. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नव्हते. राज्यात भाजप-सेनेचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. देशाला जागतिक स्तरावरील आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्या, असे आवाहन केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री जोतिरादित्य सिंधिया यांनी केले.कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे पक्षप्रभारी म्हणून सिंधिया हे वाळवा आणि शिराळा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते.पेठनाका येथे त्यांनी महाडिक शैक्षणिक संकुलातील नवमतदार असलेल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. देशाचे भविष्य तरुणाईच्या हाती आहे. त्यामुळे तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल तिथे मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळवा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.सिंधिया म्हणाले, ७० वर्षांच्या काळात विकासापेक्षा राजकारण जास्त झाले. शेतकरी, महिलांच्या हाती काहीच पडले नाही. मात्र गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकास आणि प्रगतीचा विचार शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविला जात आहे.विक्रम पाटील म्हणाले, शहरामध्ये पक्षावर निष्ठा असणारी शेकडो घरे आहेत. या सर्वांना सोबत घेत पक्षाचे संघटन वाढवत आहोत.यावेळी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख, समरजितसिंह घाटगे, मकरंद देशपांडे, राहुल महाडिक, निशिकांत पाटील, माजी आमदार भगवानराव साळुुंखे, सी. बी. पाटील, जयसिंगराव शिंदे, जयराज पाटील, जयकर पाटील, श्रीकांत शिंदे, महेश पाटील, सागर खोत उपस्थित होते.युवकांचा विश्वाससम्राट महाडिक म्हणाले, युवकांना विश्वास देत त्यांना सोबत घेऊन देशाचा विकास साधण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे. त्याला युवकांनी साथ द्यावी.

टॅग्स :SangliसांगलीJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदी