संडे स्पेशल - जिल्ह्यात सामाजिक संस्थांच्या कार्याने माणुसकीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:24 IST2021-04-18T04:24:57+5:302021-04-18T04:24:57+5:30

जत तालुक्यात चिकलगी भुयारी मठाचे मठाधिपती तुकारामबाबा महाराज यांच्या मानवमित्र संघटनेने अन्नदान, औषध, कपडे, कीट वाटप करून गरजूंना आधार ...

Sunday Special - A vision of humanity through the work of social organizations in the district | संडे स्पेशल - जिल्ह्यात सामाजिक संस्थांच्या कार्याने माणुसकीचे दर्शन

संडे स्पेशल - जिल्ह्यात सामाजिक संस्थांच्या कार्याने माणुसकीचे दर्शन

जत तालुक्यात चिकलगी भुयारी मठाचे मठाधिपती तुकारामबाबा महाराज यांच्या मानवमित्र संघटनेने अन्नदान, औषध, कपडे, कीट वाटप करून गरजूंना आधार दिला. याशिवाय परशुराम मोरे, सिद्धु जाधव यांनी जागर फाउंडेशन व ॲड. युवराज निकम व गणेश दिड्डे यांनी विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून जत शहरात स्वच्छता, आरोग्य कर्मचाऱ्यांना कीट वाटप व गरजूंना विविध प्रकारे मदत देऊ केली.

खानापूर तालुक्यातील गलाई बांधव देशातील विविध भागांत व्यवसायानिमित्त विखुरले आहेत. मात्र, कोरोना संकटात त्यांना आपल्या मायभूमीची ओढ लागून होती. या काळात रुग्णांना ऑक्सिजन मशीन देऊन महत्त्वाची सोय केली.

चाैकट

कडेगाव तालुक्यात लोकसहभाग

कडेगाव तालुक्यातील शिरसगाव येथे लोकसहभागातून गावाची स्वच्छता, सॅनिटायझरची फवारणी, कोरोना रुग्णांसाठी विविध सुविधा व गरजू नागरिकांना मदत केली जात आहे. यासाठी माजी सरपंच सतीश मांडके व शिक्षक अरुण मांडके यांचा पुढाकार असतो. तसेच मोहित्याचे वडगाव येथे सरपंच विजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना लसीकरणाबाबत प्रबोधन, बाहेरून येणाऱ्या नागरिकांबाबत खबरदारी व कोरोना चाचणी असे उपक्रम राबविले जात आहेत.

Web Title: Sunday Special - A vision of humanity through the work of social organizations in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.