संडे स्पेशल - रत्नागिरी-नागपूर, गुहागर-विजापूर महामार्गांना हवा बुस्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:25 AM2021-04-10T04:25:41+5:302021-04-10T04:25:41+5:30

रत्नागिरी - नागपूर महामार्ग जिल्ह्याला विकासाच्या महामार्गावर नेणाऱ्या रत्नागिरी - नागपूर आणि विजापूर - गुहागर या दोन महामार्गांच्या कामांना ...

Sunday Special - Air booster on Ratnagiri-Nagpur, Guhagar-Vijapur highways | संडे स्पेशल - रत्नागिरी-नागपूर, गुहागर-विजापूर महामार्गांना हवा बुस्टर

संडे स्पेशल - रत्नागिरी-नागपूर, गुहागर-विजापूर महामार्गांना हवा बुस्टर

Next

रत्नागिरी - नागपूर महामार्ग

जिल्ह्याला विकासाच्या महामार्गावर नेणाऱ्या रत्नागिरी - नागपूर आणि विजापूर - गुहागर या दोन महामार्गांच्या कामांना अजूनही गती मिळणे आवश्यक आहे. तुलनेने रत्नागिरी-नागपूरचे काम प्रगतीवर असले तरी गुहागर-विजापूरचे काम मात्र रखडले आहे.

थेट जिल्ह्याच्या अंतर्भागातून जाणारे हे पहिलेच महामार्ग आहेत, त्यामुळे त्यावरुन जिल्ह्याच्या विकासाची गाडी सुसाट धावण्याची अपेक्षा करता येते. यातील गुहागर-विजापूर महामार्गाचे काम बरेच रखडले आहे. नद्यांवरील पूल प्रलंबित आहेत. ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ देऊनही कामाला गती नाही. कराड-विटा-कडेगाव-खानापूर-जत या दुष्काळी पट्ट्याला नवसंजीवनी देणाऱ्या या महामार्गासाठी पाठपुरावा गरजेचा आहे.

रत्नागिरी - नागपूर महामार्गाच्या जिल्ह्यातील कामाला आणखी गती आवश्यक आहे. मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यांच्या विकासाला हा महामार्ग गती देणार आहे.

असा आहे लेेखाजोखा

गुहागर-विजापूर महामार्ग (क्रमांक १६६ ई)

- गुहागर-चिपळूण-पाटण-कराड-कडेगाव-विटा-खानापूर-नागज-जत-विजापूर

- एकूण लांबी ३३२ किलोमीटर, रुंदी ४६ फूट

- २०१७ मध्ये सुरुवात

- सुरुवातीचा अंदाजित खर्च १४७४.८९ कोटी

- सुमारे १९० किमी सांगली जिल्ह्यातून

- प्रारंभापासूनच कामाची गती मंद, टप्प्याटप्प्याने कामे

- येरळा, नांदणी नद्यांवरील पुलांची कामे रखडली

रत्नागिरी - नागपूर महामार्ग ( क्रमांक १६६)

- जिल्ह्यात ६६ किलोमीटर महामार्ग, ९० फूट रुंदी

- मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांतील २६ गावांतून प्रवास

- अंदाजित खर्च ४ हजार कोटी, भूसंपादनासाठी अडीच हजार कोटी

- अंकली ते मिरज व मिरज ते पंढरपूर रस्त्यावर डीएसके शोरुमपर्यंत कामे गतीने

- पंढरपूर - मिरज टप्प्यातील काम मात्र २०१७ पासून अजूनही सुरुच आहे

- रत्नागिरी, टिंक, पाली, कोल्हापूर, मिरज, सांगोला, सोलापूर, तुळजापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, बुटीबोरी, एमआयडीसी नागपूर अशा १ हजार ८७ किलाेमीटर लांबीने चार जिल्हे एकत्र जोडले जाणार

- भूसंपादनातील अडथळ्यांमुळे कामाची गती कमी

Web Title: Sunday Special - Air booster on Ratnagiri-Nagpur, Guhagar-Vijapur highways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.