शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेची मुलासह विहिरीत आत्महत्या, पाण्याचा उपसा करून मृतदेह बाहेर काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 14:03 IST

कौटुंबिक वादातून अमृतवाडी (ता. जत) येथील प्रियांका रामचंद्र बाबर (वय २८) हिने मुलगा आशिष (४ वर्षे) याच्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

सांगली : कौटुंबिक वादातून अमृतवाडी (ता. जत) येथील प्रियांका रामचंद्र बाबर (वय २८) हिने मुलगा आशिष (४ वर्षे) याच्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शनिवारी रात्री ही घटना घडली. विहिरीतील पाण्याचा उपसा करून रविवारी सकाळी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. कौटुंबिक वादातून प्रियांकाने आत्महत्या केल्याचे जत पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.देसारहट्टी (ता. अथणी) माहेर असलेल्या प्रियांकाचा दहा वर्षापूर्वी अमृतवाडीतील रामचंद्र बाबर याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर मुलगी ऐश्वर्या (७ वर्षे) व मुलगा आशिष ही दोन अपत्ये झाली. रामचंद्र हा शेती करतो. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होते. शनिवारी सायंकाळी याच कारणावरुन कडाक्याचे भांडण झाले. प्रियांका रागाच्या भरात आशिषला घेवून घराबाहेर पडली. गावातील कृष्णा बाबर यांच्या विहिरीत उडी टाकून तिने आत्महत्या केली. रात्री उशिरा हा प्रकार उघडकीस आली. पण गावात भारनियमन सुरु असल्याने मृतदेह काढणे अशक्य बनले होते. तरीही ग्रामस्थांनी प्रयत्न सुरु ठेवले होते. विहिरीला पायऱ्या नसल्याने खाली उतरणेही अवघड झाले होते. अखेर रविवारी सकाळी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. जत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.विहीर ८० फूटकृष्णा बाबर यांची विहिर ८० फूट खोल आहे. सध्या केवळ २७ फूट पाणी आहे. विहिरीला पाय-या नसल्याने आत उतरणे अवघड होते. यासाठी रविवारी सकाळी इलेक्ट्रिक मोटार लाऊन पाण्याचा उपसा करण्यात आला. सर्व पाणी काढल्यानंतर काही तरुण विहिरीत उतरले. दोरखंडाच्या मदतीने प्रियांका व आशीषचा मृतदेह बाहेर काढले.

टॅग्स :Sangliसांगली