शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात गोळी झाडून आत्महत्येचा वकिलाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:08 IST

इस्लामपूर : येथील नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालयात वकिलाने स्वत:च्या डोक्यात गावठी बनावटीच्या पिस्तुलातून गोळी झाडून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेचे नेमके कारण रात्रीपर्यंत निष्पन्न झाले नव्हते. जखमीवर कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेथे शस्त्रक्रिया करून गोळी बाहेर काढण्यात ...

इस्लामपूर : येथील नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालयात वकिलाने स्वत:च्या डोक्यात गावठी बनावटीच्या पिस्तुलातून गोळी झाडून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेचे नेमके कारण रात्रीपर्यंत निष्पन्न झाले नव्हते. जखमीवर कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेथे शस्त्रक्रिया करून गोळी बाहेर काढण्यात आली आहे. मात्र, रक्तस्राव थांबला नसल्याचे जखमीच्या निकटवर्तीयांनी सांगितले.संग्राम धोंडिराम पाटील (वय ३३, रा. कापूसखेड, ता. वाळवा) असे या वकिलाचे नाव आहे. येथील पालिकेच्या शॉपिंग सेंटरच्या पहिल्या मजल्यावर संग्राम पाटील आणि वकील मित्र संदीप भीमराव पाटील (रा. इस्लामपूर) अशा दोघांचे संयुक्त कार्यालय आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार संग्राम पाटील सकाळी आठच्या सुमारास कार्यालयात आले होते. त्यानंतर दहाच्या सुमारास संदीप पाटील आले. त्यावेळी कार्यालयाचा दरवाजा आतून कडी लावल्याने बंद होता. त्यांनी संग्राम यांना अनेक हाका मारल्या; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळतनसल्याने त्यांनी आजूबाजूला असणाºया वकील मित्रांना मदतीसाठी बोलावले. अमोल पाटील, नंदकुमार पाटील, विजय कार्इंगडे तेथे आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अ‍ॅड. कार्इंगडे यांनी संग्राम पाटील यांच्या दोघा निकटवर्तीयांना बोलावून घेतले. त्या सर्वांनी जोरात धक्का दिल्यावर दरवाजा उघडला. सर्वांनी आत जाऊन पाहिले असता अ‍ॅड. संग्राम पाटील खुर्चीवरून खाली पालथ्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडले होते.या सर्वांनी प्रसंगावधान राखून अ‍ॅड. पाटील यांना तातडीने वाहनातून शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी तेथे तातडीची शस्त्रक्रिया करून उजव्या कानाच्या वरच्या बाजूस डोक्यात असणारी बंदुकीची गोळी काढण्यात आली, परंतु रक्तस्राव थांबला नव्हता. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी काहींचे जाबजबाब नोंदवून कार्यालयातील पिस्तूल व इतर साहित्य ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अमोल शिंदे अधिक तपास करीत आहेत.अफवांना ऊतग्रामपंचायत निवडणुकीवेळी कापूसखेड येथे राष्ट्रवादी समर्थकांच्या दोन गटांत लढत झाली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली होती. शिवाय अ‍ॅड. संग्राम पाटील यांचे आर्थिक व्यवहारही मोठ्या प्रमाणात असल्याची चर्चा होती. त्यातून त्यांच्यावर हल्ला झाला असावा, अशी अफवा पसरली होती.मात्र, पोलिसांनी घटनास्थळावरील परिस्थिती आणि अ‍ॅड. पाटील यांना उपचारासाठी घेऊन जाणाºया त्यांच्या मित्रांकडून माहिती घेत हा आत्महत्येच्या प्रयत्नाचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, या घटनेपाठीमागील निश्चित कारण आणि पिस्तूल याबाबत जखमीचा जबाब अथवा त्यांच्या कुटुंबीयांनी माहिती दिल्याशिवाय समजू शकणार नाही, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.डायरीवर ‘सॉरी’अ‍ॅड. संग्राम पाटील यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेण्यापूर्वी टेबलवर असलेल्या वकील डायरीच्या पहिल्या पानावर ‘सॉरी’ असा शब्द इंग्रजीमध्ये लिहिला होता. टेबलवरच त्यांचा मोबाईल पडला होता, तर गोळी झाडून घेतल्यानंतर ते खुर्चीमधून खाली कोसळून पालथ्या अवस्थेत पडले होते. त्यांच्या खुर्चीवर आणि खाली रक्त सांडले होते.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस