कुपवाडमध्ये दोघांची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:33 IST2021-02-17T04:33:05+5:302021-02-17T04:33:05+5:30
कुपवाड : शहरातील कुपवाड - मिरज रस्त्यालगत असलेल्या एका कंपनीसमोर विद्युत खांबाला प्रवीण बाळासाहेब माळी (वय २७, रा. ...

कुपवाडमध्ये दोघांची गळफास घेऊन आत्महत्या
कुपवाड : शहरातील कुपवाड - मिरज रस्त्यालगत असलेल्या एका कंपनीसमोर विद्युत खांबाला प्रवीण बाळासाहेब माळी (वय २७, रा. कोंडके मळा, बामणोली) याने दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. दुसऱ्या एका घटनेत शरदनगर येथील विठ्ठल व्यंकटराव कुट्टे (वय ५५, रा. मूळ गाव अथणी, कर्नाटक) याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सोमवारी रात्री प्रवीण माळी याने कुपवाड-मिरज रस्त्यालगत असलेल्या एका कंपनीसमोर विद्युत खांबाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलीस तपास करीत आहेत. दुसऱ्या घटनेत शहरातील विठ्ठल व्यंकटराव कुट्टे (वय ५५, रा. सध्या शरदनगर, कुपवाड. मूळ गाव अथणी, कर्नाटक) याने मंगळवारी सकाळी राहत्या घरातील छतास नायलाॅन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलीस तपास करीत आहेत.