शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणातील सरपंचाच्या भाच्यावर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:23 IST

कवठेमहांकाळ : शहरातील जत रस्त्यावरील गजबजलेल्या थबडेवाडी चौकात अमर जयराम आटपाडकर (वय २८, रा. पिंपळवाडी) याच्यावर पूर्ववैमनस्यातून जीवघेणा ...

कवठेमहांकाळ : शहरातील जत रस्त्यावरील गजबजलेल्या थबडेवाडी चौकात अमर जयराम आटपाडकर (वय २८, रा. पिंपळवाडी) याच्यावर पूर्ववैमनस्यातून जीवघेणा हल्ला झाला. हरोलीचे माजी सरपंच युवराज पाटील यांच्या खून प्रकरणातील संशयित रमेश खोत याचा तो भाचा आहे. ही घटना शनिवारी सकाळी साडेनऊला घडली. या जीवघेण्या हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आटपाडकर गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर मिरजेत उपचार सुरू आहेत.

कवठेमहांकाळ पोलिसांनी हरोलीचे माजी सरपंच युवराज पाटील यांचा मुलगा मारुती ऊर्फ राष्ट्रपती युवराज पाटील, अनंत पारे यांना ताब्यात घेतले आहे. अद्याप दोघेजण फरार आहेत.

बोरगावमधील हाणामारी प्रकरणापाठोपाठ शनिवारी कवठेमहांकाळ तालुक्यात पुन्हा जीवघेण्या हल्ल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. अमर आटपाडकर पिंपळवाडीचा माजी सरपंच रमेश खोत याचा भाचा आहे. रमेश खोत हा हरोलीचे माजी सरपंच युवराज पाटील यांच्या खून प्रकरणातील संशयित आहे. सध्या तो मोक्काच्या कारवाईखाली कारागृहात आहे. अमर हा खोत याचा भाचा असल्याने युवराज पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे त्याच्याशीही वैमनस्य आहे.

अमरचे येथील थबडेवाडी चौकात ऑनलाईन लॉटरीचे दुकान आहे. सकाळी ते उघडण्यासाठी तो आला होता. दुकान उघडण्याआधी तो शेजारील हॉटेलजवळ उभा होता. तेथे दुचाकीवरून चार अज्ञात हल्लेखोर आले. काही समजण्याच्या आतच त्यांनी हातातील कुकरीने अमरवर जीवघेणा हल्ला केला. त्याच्या डोक्यावर, पोटावर, छातीवर सपासप वार केले. झटापटीत अमर खाली पडला. तिथे असणारे हॉटेलमालक विजय माने यांनी हल्लेखोरांना अडवले. त्यानंतर तिथे शेजारचे दुकानदार पळत आले. त्यांना पाहून हल्लेखोर गाडी तिथेच टाकून पसार झाले. अमर याला मिरज येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी हरोलीचे माजी सरपंच युवराज पाटील यांचा मुलगा मारुती ऊर्फ राष्ट्रपती युवराज पाटील, अनंत पारे या दोघांना ताब्यात घेतले आहे. अद्याप दोघे फरार आहेत. या घटनेने कवठेमहांकाळ तालुका हादरला आहे.

चौकट

टोळीयुद्ध भडकणार

गेले वर्ष-दीड वर्ष शांत असणारा कवठेमहांकाळ तालुका पुन्हा सुडाच्या भावनेने पेटला आहे. तालुक्यात पुन्हा टोळीयुद्ध भडकणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या आठवड्यात बोरगावच्या हाणामारी प्रकरणानंतर लगेच हा हल्ला झाल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण आहे.