शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

ऊस वाहतूकदारांची दोन वर्षात हजार कोटींची फसवणूक - राजू शेट्टी  

By अशोक डोंबाळे | Updated: February 18, 2023 11:54 IST

लाखो रुपये बुडाल्याने वाहतूकदार देशोधडीला लागले

सांगली : राज्यातील ऊस वाहतूकदारांची मुकादमांनी गेल्या दोन वर्षांत एक हजार कोटी रुपयांची फसवणूक केलेली आहे. त्यातून दोन खून, दहा आत्महत्या झाल्या. १०२५८ मुकादमांनी वाहतूकदारांना टोपी घातली असून ते आता महागडी वाहने घेऊन रुबाबात फिरतात. यात केंद्र व राज्य सरकारने लक्ष घालावे, गोपीनाथ मुंडे ऊस तोडकरी कल्याण महामंडळाने तोडणी कामगार द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी आणि भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.शेट्टी व पवार म्हणाले, ऊस वाहतूकदारांनी कर्ज काढून त्यांनी वाहने घेतली. मुकादमांना ॲडव्हान्स दिला. तेच सध्या टोप्या घालत आहेत. त्यांच्याकडे वसुलीला गेल्यानंतर ॲट्रॉसिटी, खुनाचे गुन्हे दाखल आहेत. लाखो रुपये बुडाल्याने वाहतूकदार देशोधडीला लागले आहेत. साखर आयुक्तालयाच्या माहितीनुसार राज्यातील १०२५८ मुकादमांनी फसवणूक केली आहे. ही रक्कम आमच्या हिशेबाने एक हजार कोटींवर आहे.

या स्थितीत ऊस तोडकरी महामंडळ काय करते?, केवळ कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करायला हे महामंडळ काम करतेय का? त्यांनी तोडकरी पुरवले पाहिजेत, तरच महामंडळासाठी प्रतिटन दहा रुपयांचा निधी कपातीस आम्ही मान्यता देऊ. मुकादम ही व्यवस्थाच मोडीत काढायला हवी. त्यांना १९ टक्के म्हणजे टनामागे ५२ रुपये का द्यायचे? त्याऐवजी महामंडळाला दहा रुपये देऊ. ही रक्कम राज्यात १३२ कोटी होते. त्यातून महामंडळ सक्षम होईल. मुकादम पोसू नका, तोडकऱ्यांच्या हिताकडे लक्ष द्यावे.बँकांनी तगादा लावू नयेऊस वाहतूकदारांच्या कर्जाच्या वसुलीसाठी बँकांनी तगादा लावू नये, जे फसवले गेले आहेत त्यांची कर्जे रूपांतरित करून त्यांना पाच वर्षे मुदत द्यावी, फसव्या मुकादमांना काळ्या यादीत टाकावे, पोलिस पथक नेमून या प्रकारांची चौकशी करावी, या मागण्यासाठी लढा सुरू आहे. त्यासाठी स्वाभिमानी ऊसतोडणी वाहतूक संघटना स्थापन केली आहे. सरकारला पंधरा दिवसांची मुदत देतोय, असेही शेट्टी म्हणाले.बुधवारी चक्काजामवीज दरवाढीच्या विरोधात बुधवारी दि. २२ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन पुकारले. ३७ टक्के वीज दरवाढ असून त्याला आमचा विरोध आहे. शेतकऱ्यांना तुम्ही दिवसा वीज देत नाही. वीज व्यवस्थापन नीट करत नाही. बंद पंपांचे पैसे वसूल करता, सरकारची अनुदान लाटता, हे सिद्ध झाले आहे, असा आरोपही शेट्टी यांनी केला.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने