शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

Sangli News: पाणी योजनांच्या वसुलीस ऊस बाहेर गेल्याने फटका, कडेगावातील चित्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 17:13 IST

बाहेरचे कारखाने सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रातील ऊस नेतात मात्र पाणीपट्टी वसुलीबाबत उदासीनता दाखवितात

प्रताप महाडीककडेगाव : कडेगाव तालुक्यातील ऊस पलूस, कडेगावसह कऱ्हाड व खटाव तालुक्यातील कारखाने नेतात. मात्र बाहेरील व कर्नाटकातील काही साखर कारखान्यांनीही यंदा तालुक्यातील ऊस मोठ्या प्रमाणावर नेला. ऊस कोणत्या कारखान्याला द्यावा, हे शेतकऱ्यांच्या मर्जीचा विषय असला तरी बाहेरच्या कारखान्यांना ऊस गेल्याने ताकारी, टेंभू सिंचन योजनांची पाणीपट्टी व सहकारी सोसायट्यांच्या पीककर्ज वसुलीवर परिणाम होत आहे. कडेगाव तालुक्यात राज्याबाहेरील विशेषतः कर्नाटकातील काही साखर कारखाने ऊस  घेऊन जातात. या कारखान्यांनी संबंधित गावातील शेती पिकांसाठी सिंचन योजना तसेच पीक कर्ज देणारी सहकारी सोसायटीच्या वसुलीसाठी सहकार्य करणे अपेक्षित आहे. मात्र ते होत नाही. ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजनांमुळे कडेगाव तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठे आहे. साधारणपणे २५ ते ३०  लाख टन उसाचे उत्पन्न होते. सध्या गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे. काही कारखाने बंद झाले आहेत. ऊस बाहेरील साखर कारखान्याला गेला. बिलही शेतकऱ्यांना मिळाले. मात्र पाणीपट्टी आणि पीक कर्ज भरले नाही असे कित्येक शेतकरी आहेत. उसाचे क्षेत्र मोठे असल्याने यावर्षी वेळेत ऊसतोड मिळेल की नाही अशी शक्यता असल्याने काही शेतकऱ्यांनी तोड मिळेल त्या कारखान्याला ऊस दिला. हे बाहेरचे कारखाने सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रातील ऊस नेतात मात्र पाणीपट्टी वसुलीबाबत उदासीनता दाखवितात. स्थानिक कारखान्यांना ऊस घालण्यासाठी शेतकऱ्यांत स्पर्धा दिसते. मात्र तोड मिळत नसल्याने नाइलाज झाला म्हणूनही काही शेतकरी बाहेर ऊस देतात.प्रामाणिकांना भुर्दंड  सिंचन योजनांचे पाणी वापरणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांची पाणी वसूल होणे गरजेचे आहे मात्र काही शेतकरी जाणीवपूर्वक बाहेरील कारखान्यांना ऊस देऊन विनाकपात बिल घेतात. प्रामाणिक शेतकऱ्यांना याचा भुर्दंड सहन करावा लागतो.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेWaterपाणी