शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात साखरेचे उत्पादन १९ लाख क्विंटलने घटले, गळीत हंगामाची सांगता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 18:42 IST

साखर उताऱ्यातही घट : दीड महिन्यापासून शेतकऱ्यांना बिल मिळाले नाहीत

अशोक डोंबाळेसांगली : जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी ७७ लाख ६ हजार ३६४ टन उसाचे गाळप करून ८१ लाख ४६ हजार ५४० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. पण, २०२३-२४ च्या गळीत हंगामाच्या तुलनेत २०२४-२५ मध्ये १८ लाख ९५ हजार ३४६ क्विंटलने साखरेचे उत्पादन घटले आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील कारखान्यांच्या सरासरी साखर उताऱ्यातही ०.६६ टक्के घट झाली आहे. दरम्यान, कारखान्यांचे गळीत हंगाम संपले तरीही गेल्या दीड महिन्यापासून उसाची बिले शेतकऱ्यांना मिळाली नसल्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी २०२३-२४ च्या गळीत हंगामामध्ये ८८ लाख ८३ हजार २४५ टन उसाचे गाळप करून १ कोटी ४१ हजार ८८६ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. साखरेचा सरासरी उतारा ११.१२ टक्के होता. २०२४-२५ च्या गळीत हंगामामध्येही जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होते. पण, उसाची उपलब्धता कमी झाल्यामुळे त्याचा कारखान्यांच्या गाळपावर परिणाम झाला आहे. सर्वच साखर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत. या कारखान्यांनी ७७ लाख ६६ हजार ३६४ टन उसाचे गाळप झाले असून ८१ लाख ४६ हजार ५४० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास १८ लाख ९५ हजार ३४६ क्विंटलने साखरेचे उत्पादन घटले आहे. २०२३-२४ मध्ये साखरेचा सरासरी उतारा ११.१२ टक्के असून यामध्ये ०.६६ टक्क्यांनी घट होऊन २०२४-२५ च्या गळीत हंगामात १०.४६ टक्के राहिला आहे. साखर उतारा घटल्यामुळे त्यांचा परिणाम एफआरपी निश्चित करण्यावर होणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

साखर कारखान्यांचे गळीत हंगाम संपले आहेत. तरीही बहुतांशी कारखान्यांनी १ फेब्रवारी ते २५ मार्चपर्यंत गाळपास गेलेल्या उसाची बिले शेतकऱ्यांना दिली नाहीत. ही रक्कम ४०० ते ५०० कोटींहून जास्त असण्याची शक्यता आहे.

कारखान्यांची बिल न मिळाल्यामुळे कर्ज थकबाकीत : संदीप राजोबासाखर कारखान्यांनी ऊस गळितास गेल्यापासून १४ दिवसांत शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजेत. पण, कारखान्यांचे गळीत हंगाम संपले तरीही शेतकऱ्यांना गेल्या दीड महिन्यापासून पैसेच दिले नाहीत. शेतकऱ्यांची कर्ज थकबाकीत गेल्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा आणखी वाढणार आहे. यास साखर कारखानदार जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने