शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

..'तर साखर कारखान्यांच्या अध्यक्षांच्या घरासमोर ठिय्या मारु'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 17:37 IST

जिल्ह्यात सुमारे सव्वालाख हेक्टर ऊसाचे क्षेत्र आहे. त्यातील एक लाख हेक्टर ऊसाचे गाळप झाले आहे. उर्वरीत ऊस शिल्लक आहे. यादरम्यान, काही कारखाने गाळप हंगामाची सांगता करण्याच्या तयारीत आहेत.

सांगली : जिल्ह्यात अद्याप सुमारे २० ते २५ हजार हेक्टरवरील तोडणी आणि गाळप होईपर्यंत साखर कारखाने बंद करू नयेत अशी मागणी स्वाभिमानी संघटनेने केली आहे. कारखाने बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.खराडे म्हणाले, जिल्ह्यात सुमारे सव्वालाख हेक्टर ऊसाचे क्षेत्र आहे. त्यातील एक लाख हेक्टर ऊसाचे गाळप झाले आहे. उर्वरीत ऊस शिल्लक आहे. यादरम्यान, काही कारखाने गाळप हंगामाची सांगता करण्याच्या तयारीत आहेत, मात्र त्याचेही गाळप झालेच पाहिजे.ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ, विसापूर, पुणदी सिंचन योजना सुरू झाल्याने दुष्काळी भागात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. ऊस वाढला तरी तासगाव, नागेवाडी, महांकाली आणि माणगंगा केन ॲग्रो कारखाने बंद आहेत. त्यामुळे ऊसाच्या संपुर्ण गाळपात अडचणी आहेत.ऊस शिल्लक राहण्याची शक्यता असल्याची बाब साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या निदर्शनास यापूर्वीच आणून दिली होती. त्यानुसार त्यांनी सर्व कारखान्यांना आवश्यक सूचनाही दिल्या होत्या. तरीही काही कारखान्यांनी गाळप हंगामाच्या सांगतेची तयारी सुरू केली आहे. सांगलीतील दत्त इंडिया तथा वसंतदादा साखर कारखान्याने ३१ मार्चला कारखाना बंदचे जाहीर निवेदन दिले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पुढाकार घ्यावा. सर्व कारखानदारांची बैठक घेऊन १०० टक्के ऊसाच्या गाळफाचे आदेश द्यावेत. तोपर्यंत कारखाने बंद करू नयेत असेही आदेश द्यावेत.... तर कारखान्याच्या अध्यक्षांच्या घरासमोर आंदोलनगाळपापूर्वीच कारखाने बंद करणाऱ्या कारखान्यांच्या अध्यक्षाच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा खराडे यांनी दिला. तशी वेळ येऊ नये यासाठी कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील ऊसाच्या कांड्याचे गाळप होईल याची दक्षता घ्यावी असे ते म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना