शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

पूरबाधित गावे पुन्हा सर्वांग सुंदर बनविण्यासाठी योगदान द्यावे - सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 6:20 PM

पूर ओसरला असून लोक आपआपल्या गावांकडे परतत आहेत. उध्वस्त झालेली गावे, संसार पुन्हा सावरून त्यांना पुन्हा नव्या उमेदीने जीवन सुरू करण्यासाठी त्यांचा परिसर, गावे सर्वांगाने सुंदर बनविण्यासाठी सर्वांनी पुढे येवून भरीव योगदान द्यावे, असे प्रतिपादन सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देपूरबाधित गावे पुन्हा सर्वांग सुंदर बनविण्यासाठी योगदान द्यावे - सुभाष देशमुखसामाजिक संस्था, संघटना व प्रशासन यांच्यासमवेत बैठक

सांगली : पूर ओसरला असून लोक आपआपल्या गावांकडे परतत आहेत. उध्वस्त झालेली गावे, संसार पुन्हा सावरून त्यांना पुन्हा नव्या उमेदीने जीवन सुरू करण्यासाठी त्यांचा परिसर, गावे सर्वांगाने सुंदर बनविण्यासाठी सर्वांनी पुढे येवून भरीव योगदान द्यावे, असे प्रतिपादन सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.पूरबाधितांना मदत करण्यासाठी शासन युध्दपातळीवर प्रयत्न करत आहेच, यासोबतच विविध सामाजिक संस्था, संघटनाही प्रयत्न करत आहेत. या सर्वांनी एकाच छत्राखाली येवून सुसुत्रपणे मदत केल्यास कोणीही पुरबाधित मदतीपासून वंचित राहणार नाही. यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी सामाजिक संस्था, संघटना व प्रशासन यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बैठक घेतली.

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, विशेष कार्य अधिकारी रविंद्र खेबुडकर, महावितरणच्या संचालिका निता केळकर, दिपक शिंदे (म्हैसाळकर), विविध सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.पूरबाधितांना मदत करण्यासाठी समाजातील वेगवेगळे घटक वेगवेगळ्या पध्दतीने काम करीत आहेत. हे काम एकत्रित व समन्वयाने झाल्यास सर्व पुरबाधितांपर्यंत मदत पोहोचेल त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल कक्ष तयार करण्यात आला आहे. सर्वांनी या कक्षांतर्गत काम करावे, असे आवाहन करून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, पुरबाधितांना मानसिक, आर्थिक आधाराची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन केले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली डिझास्टर ग्रुप तयार करण्यात आला असून सर्व संघंटनांनी एका छत्राखाली येवून कामाचे नियोजन केल्यास अधिक सुसुत्रता येईल असे सांगून प्रत्येक पुरबाधित गावासाठी एक अधिकारी नियुक्त केला आहे. गावांच्या पुनर्बांधणीसाठी पुढे येणाऱ्या संस्थेसोबत प्रशासनातर्फे एमओयु करण्यात येईल. एखादे गाव संस्थेने दत्तक घेतल्यानंतर करता येण्यासारख्या बाबींचा करार केला जाईल, असे सांगून मदतीच्या सुयोग्य नियोजनासाठी तसेच अडचणी अथवा मदत हवी असल्यास आपत्ती निवारण कक्षाच्या 9370333932, 8208689681, 0233-2600500, टोल फ्री क्रमांक 1077 या क्रमांकावर संपर्क साधा, आम्ही त्यां नोंदवून घेऊ व संबंधित अधिकाऱ्यांच्यामार्फत त्यांचे निवारण करू असे सांगितले.अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी स्वच्छता, आरोग्य, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, घरे, इमारतींचे सर्व्हेक्षण, शिक्षण, एकात्मिक बाल विकास सेवा आदि क्षेत्रामध्ये एनजीओ, विविध संघटनांमार्फत मदत मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले.यावेळी विविध संस्था, संघटनांनी सर्व सामाजिक संघटना, सर्व एनजीओ यांनी आपत्तीवर मात करण्यासाठी प्रशासनाबरोबर कटिबध्द आहेत. आयटी सर्व्हिसेससह जीवनोपयोगी वस्तू, शालोपयोगी वस्तू, आरोग्य, स्वच्छता, समुपदेशन आदि सर्व क्षेत्रांमध्ये प्रशासनाच्या बरोबर राहून मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिले. 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली