शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: फसवणुकीच्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी ८ लाखांची मागणी, पलूसमध्ये उपनिरीक्षकाला दोन लाखांची लाच घेताना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 13:49 IST

पलूस : फॉरेक्स ट्रेडिंगमधील फसवणुकीच्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी ८ लाखांची मागणी करून दोन लाख रुपये लाच घेताना पलूस पोलिस ...

पलूस : फॉरेक्स ट्रेडिंगमधील फसवणुकीच्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी ८ लाखांची मागणी करून दोन लाख रुपये लाच घेताना पलूस पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक महेश बाळासाहेब गायकवाड (वय ३६, रा. सध्या रा. प्रथमेश अपार्टमेंट, तासगाव कराड रोड, पलूस, मूळ रा. केडगाव गावठाण, दौंड, ता. दौंड, जि. पुणे) याला अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक असून फॉरेक्स ट्रेडिंगचा व्यवसायदेखील करतात. दि. ०५ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांच्यावर मारहाणप्रकरणी पलूस पोलिस ठाण्यात बीएनएस कलम ११८(२),११५,१८९(२),१८९(४),१९१(१),१९१(३),१९०,६१(२) नुसार गुन्हा दाखल आहे. दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी तपासानुसार त्यांना संशयित आरोपी केले होते. दि. ०४ जानेवारी २०२५ रोजी तक्रारदार यांना किसान टायर्स पलूस येथून ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. उपनिरीक्षक गायकवाड याने अटकेची भीती दाखवून तक्रारदारांकडे १० लाख रुपये लाचेची मागणी केली. त्याच दिवशी तक्रारदार यांच्याकडून २ लाख रुपये घेऊन त्यांना अटकपूर्व जामीन करून घ्या, असे सांगून सोडून देण्यात आले होते. दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी तक्रारदार यांना उच्च न्यायालयातून जामीन मंजूर झाला. त्यानंतर उपनिरीक्षक गायकवाड याने तक्रारदार यांना समक्ष पोलिस ठाण्यात बोलावले. फोनद्वारे बोलवून घेऊन उर्वरित ८ लाख रुपये देण्यासाठी वारंवार तगादा लावला होता. दि.२५ मार्च २०२५ रोजी तक्रारदार यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेऊन उर्वरित ८ लाख रुपयांची व्यवस्था कर, अन्यथा तुझी चारचाकी गाडी गुन्ह्यात जप्त करीन, तसेच फोरेक्स ट्रेडिंगच्या अनुषंगाने तुझी चौकशी चालू आहे, त्यामध्येही तुझ्याविरुद्ध अजून एक गुन्हा दाखल करीन, अशी उपनिरीक्षक गायकवाड याने धमकी दिली. उर्वरित ८ लाख रुपये मागून तडजोडीत दोन लाख रुपये देण्याचे ठरले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून उपनिरीक्षक गायकवाड याला त्याच्या केबिनमध्ये दोन लाख रुपये लाच स्वीकारल्यानंतर रंगेहात पकडण्यात आले. उपअधीक्षक उमेश पाटील, हवालदार रामहरी वाघमोडे, प्रीतम चौगुले, अजित पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिस