शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरला, अधिसभेत ठराव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 13:33 IST

अॅड. वैभव पाटील यांच्या प्रयत्नांना यश

विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथेच व्हावे, यासाठी विद्यापीठाच्या अधिसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मांडलेल्या ठरावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. शिवाजी विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही या ठरावाला पाठिंबा दिला.शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या ॲड. वैभव पाटील यांनीही ही मागणी लावून धरली होती. शुक्रवारी शिवाजी विद्यापीठाची अधिसभा झाली. यावेळी पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, तासगाव, कडेगाव, कवठेमहांकाळ, जत व पलूस, तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि सातारा जिल्ह्यातील खटाव, माण व फलटण या दुष्काळी तालुक्यांतील विद्यार्थी व पालक यांच्या सोयीसाठी खानापूर येथेच शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे, यासाठीचा ठराव सभेत मांडला.

या ठरावाला प्राध्यापक संघटना, विद्यापीठ विकास आघाडी, विकास मंच यांनी सर्वानुमते पाठिंबा दिला. विशेष म्हणजे, ठरावाला भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी पाठिंबा दिला. जिल्ह्याचे सुटा अध्यक्ष प्रा. निवास वरेकर, संजय परमाणष, प्रा. गायकवाड यांनीही अभ्यासपूर्ण मते मांडली.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या खानापूर येथील विद्यापीठ उपकेंद्राच्या मागणीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. अधिसभेच्या मंजुरीनंतर हा ठराव शासनाकडे जाणार असून, तेथे अंतिम मंजुरी मिळेल. त्यासाठी केलेल्या प्रयत्नाला पहिल्या टप्प्यात यश आल्याचे समाधान वाटते. - ॲड. वैभव पाटील, सदस्य, शिवाजी विद्यापीठ अधिसभा

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ