विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:25 IST2021-03-05T04:25:37+5:302021-03-05T04:25:37+5:30
कुंडल (ता. पलूस) प्रतिनिधी हायस्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमात सी. वाय. जाधव बोलत होते. ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय ...

विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा
कुंडल (ता. पलूस) प्रतिनिधी हायस्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमात सी. वाय. जाधव बोलत होते. ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय विज्ञान दिन २८ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. डॉ. सी. व्ही. रमण यांनी एकाच रंगाचे प्रकाशकिरण घेऊन ते निरनिराळ्या पदार्थांतून नेले. त्या पदार्थांतून पडणारा प्रकाश तपासून पाहिला असता त्यांना प्रकाशाच्या तरंगलांबीत बदल झालेला दिसला; म्हणून त्यास ‘रमण परिणाम’ म्हणतात. भावी आयुष्यात विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात करिअर करावे.
एस. ए. देशमुख म्हणाले, विज्ञान म्हणजे घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सकपणे पाहणे होय. प्रत्येकाने वैज्ञानिक बाबींचा विधायक कामासाठी वापर करावा. त्याचा दुरुपयोग करू नये.
यावेळी एस. एस. खरात, विज्ञान शिक्षिका व्ही. व्ही. पाटील, विज्ञान विभागप्रमुख व्ही. एम. जाधव, के. एन. साळवी, जे. एस. लाड, व्ही. एस. लाड, पी. आर. पाटील, जी. के. एडके, डी. एस. शिंदे, आदी उपस्थित होते.