शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

मातब्बरांमध्ये प्रतिष्ठेच्या लढाईसाठी संघर्ष अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 12:15 AM

औद्योगिक वसाहतीलगत आणि शहराच्या उत्तरेच्या बाजूच्या विस्तारित गुंठेवारी भागाने व्यापलेल्या प्रभाग क्रमांक एकमध्ये यंदा काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच भाजप आदी पक्षामधून इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत

महालिंग सलगर ।कुपवाड : औद्योगिक वसाहतीलगत आणि शहराच्या उत्तरेच्या बाजूच्या विस्तारित गुंठेवारी भागाने व्यापलेल्या प्रभाग क्रमांक एकमध्ये यंदा काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच भाजप आदी पक्षामधून इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत आहे. मात्र, या नव्याने तयार झालेल्या प्रभागात आजी-माजी उपमहापौरांबरोबरच विरोधी पक्षनेते, माजी स्थायी समिती सभापती, माजी गटनेते आदींनी हा प्रभाग काबीज करण्यासाठी कंबर कसल्याने निवडणूक संघर्ष अटळ असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.

माजी उपमहापौर प्रशांत पाटील, विद्यमान उपमहापौर विजय घाडगे, नगरसेवक धनपाल खोत, नगरसेविका निर्मला जगदाळे, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांचा जुन्या वॉर्डातील भाग एकत्र करून हा नवा प्रभाग झाला आहे. तसे या प्रभागावर काँग्रेसचे व राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. तरीही या पाच वर्षात राजकीय परिस्थिती बदलली असून, इतरही राजकीय पक्ष व संघटनांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

काँग्रेसचे माजी उपमहापौर प्रशांत पाटील, उपमहापौर विजय घाडगे, माजी उपमहापौर मोहन जाधव, राष्टवादीचे ज्येष्ठ नगरसेवक धनपाल खोत हे या प्रभागातून इच्छुक आहेत. दिलीप सूर्यवंशी गटही येथे इच्छुक आहे. राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते यांनी तयारी केली असली तरीही भाजपचे रवींद्र सदामते यांनी त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.राष्ट्रवादीच्या रईसा मुश्ताकअली रंगरेज, परवेज मुलाणी हेही इच्छुक तयारी करीत आहेत. भाजपकडून विश्वजित पाटील, माया गडदे, अजित जगताप, सुधार समितीमधून सचिन चोपडे या इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. जनता दलाकडून सिंधूताई मोहन जाधव, काँग्रेसकडून धनश्री संतोष रूपनर, धनश्री राहुल रूपनर यांची नावे चर्चेत आहेत.नैसर्गिक नाल्याचा प्रश्न गंभीरकुपवाड शहरात या प्रभागात बामणोलीकडून येणारा मोठा नैसर्गिक नाला वाहतो. या नाल्यावर अतिक्रमण झाल्याने पावसाळ्यात अनेक घरात पाणी शिरते. या नाल्यावर सूतगिरणीजवळ अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे सांडपाणी वाहून न जाता तुंबून राहते. त्यातून या परिसरात आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.आरक्षणअ - अनुसूचित जातीब - ओबीसी महिलाक - सर्वसाधारण महिलाड- सर्वसाधारण खुुला

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक