पूरग्रस्तांना मदत मिळेपर्यंत सरकारशी संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:28 IST2021-07-30T04:28:20+5:302021-07-30T04:28:20+5:30
भिलवडी : महापुरामुळे कृष्णाकाठच्या गावांचे मोठे नुकसान होत आहे. आम्ही सत्तेत असताना नियमांच्या बाहेर जाऊन पूरग्रस्तांना सरसकट मदत केली ...

पूरग्रस्तांना मदत मिळेपर्यंत सरकारशी संघर्ष
भिलवडी : महापुरामुळे कृष्णाकाठच्या गावांचे मोठे नुकसान होत आहे. आम्ही सत्तेत असताना नियमांच्या बाहेर जाऊन पूरग्रस्तांना सरसकट मदत केली होती. आताच्या सरकारनेदेखील २०१९च्या महापूर धोरणानुसार पूरग्रस्तांना मदत करावी. शेवटच्या पूरग्रस्तांपर्यंत मदत मिळेपर्यंत सरकारशी संघर्ष सुरू ठेवणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भिलवडी (ता. पलूस) येथे देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, खासदार संजय काका पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख, नीता केळकर यांनी भेट दिली. यावेळी घरे, बाजारपेठेची पाहणी केली. भिलवडी पुलास पर्यायी व पाण्यात न बुडणाऱ्या पुलांची उभारणी करणे गरजेचे असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील, विजयकुमार चोपडे, प्रा. महेश पाटील, मुन्ना पठाण, तानाजी भोई, संभाजी महिंद आदी उपस्थित होते.