शिराळा येथे लॉकडाऊनचा कडक अंमल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:27 IST2021-05-07T04:27:44+5:302021-05-07T04:27:44+5:30
फोटो ओळ : शिराळा येथील चेकपोस्टवर पोलीस कर्मचारी नागरिकांची कसून चाैकशी करत आहेत. फोटो-०६शिराळा३ व ४ फोटो ओळ : ...

शिराळा येथे लॉकडाऊनचा कडक अंमल
फोटो ओळ : शिराळा येथील चेकपोस्टवर पोलीस कर्मचारी नागरिकांची कसून चाैकशी करत आहेत.
फोटो-०६शिराळा३ व ४
फोटो ओळ : शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी झालेली गर्दी.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा
: जिल्ह्यात गुरुवारपासून कडक लॉकडाऊन सुरू झाला आहे. शिराळा येथे पहिल्यादिवशी औषध दुकाने, दूध केंद्रे वगळता बाजारपेठेतील सर्व दुकाने कडकडीत बंद होती. मात्र काहीजण अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गावातून फेरफटका मारताना दिसत होते. पोलिसांनी ठिकाणी नाकेबंदी केली होती.
सातारा, कोल्हापूर जिल्ह्यास जोडणारे रस्ते बंद केले आहेत.
शिराळा व कोकरूड पोलीस ठाण्यामार्फत गावा-गावात बंदोबस्त तसेच फिरत्या पथकामार्फत नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात येत होता. तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लवार, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश वाडेकर यांनी लॉकडाऊनचे काटेकोर पालन केले जाते का याची पाहणी केली.
नाकेबंदी करण्यात आलेल्या ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत होती. अशा परिस्थितीत आता शेतकरी व भाजीपाला विक्रेत्यांना आपल्या मालाचे काय करायचे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काहीजण घरोघरी जाऊन भाजीपाला विक्री करण्याचा, तर काही शेतकरी भाजीपाला खराब होण्यापेक्षा एखाद्याच्या मुखात जावा, या भावानेतून मोफत देण्याचा प्रयत्न करीत होते.
चाैकट
लसीबाबत संभ्रम
कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ४४ वर्षांच्या आतील नागरिकांना की दुसरा डोस घेणाऱ्यांना लस मिळणार, हा संभ्रम असल्याने सारखे वादाचे प्रसंग होत होते. लस घेणाऱ्या नागरिकांकडून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवला होता.