‘लालपरी’त साेशल डिस्टन्सिंगचे काटेकाेर पालन गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:25 IST2021-03-18T04:25:58+5:302021-03-18T04:25:58+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पलूस : काेराेनाच्या कडक लॉकडाऊननंतर सावरत सर्वसामान्यांची ‘लालपरी’ अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस रस्त्यावर येत आहेत. ...

‘लालपरी’त साेशल डिस्टन्सिंगचे काटेकाेर पालन गरजेचे
लाेकमत न्यूज नेटवर्क
पलूस : काेराेनाच्या कडक लॉकडाऊननंतर सावरत सर्वसामान्यांची ‘लालपरी’ अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस रस्त्यावर येत आहेत. महिन्याभरात स्थिती सावरत असताना पुन्हा काेराेना डाेके वर काढू लागला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने वेळीच सावधानता बाळगत साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांची काटेकाेर अंमलबजावणी गरजेची आहे.
लालपरी कोरोनाच्या काळात बंद होती. काही महिन्यांपूर्वी शासनाने काही अटींवर बससेवा सुरू करण्यास परवानगी दिली. पण, काेराेनाची धास्ती कमी झाल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये या नियमांना हरताळ फासल्याचे दिसते आहे. बहुतांश चालक किंवा वाहक मास्क वापरत नाहीत. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने ‘लालपरी’ कोरोना विषाणूची प्रसारक होऊ शकते. एकीकडे दुचाकीस्वार सामान्य नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात असताना बस चालकांना काहीच बंधने नाहीत? का? असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.
जिल्हाबंदी उठली तेव्हा अनेकांनी आपापल्या पै-पाहुण्यांकडे धाव घेतली, मधल्या काळात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याचे चित्र असताना प्रशासनाने निर्बंध घालून व्यवसाय सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर महत्त्वाचा आहे. तरीही परिवहन मंडळाचे व्यवस्थापन या गोष्टींकडे गांभीर्याने बघत नाही. पोलीस प्रशासन इतर ठिकाणी दंड आकारत आहे. मग शासकीय वाहनांना सूट दिली आहे का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पलूस तालुक्यातून जिल्ह्यात आणि जिल्हा बाहेरही बससेवा सुरू आहे. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे तंतोतंत पालन करणे अनिवार्य आहे. तसेच बस थांब्यावर स्वतः बस नियंत्रक, चालक, वाहक तंबाखू खाऊन थुंकताना दिसतात. यामुळेही या विषाणूचा प्रादुर्भाव लगेचच पसरण्याची भीती आहे. काेराेनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने सामाजिक भान ठेवून याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना करणे गरजेचे आहे.