शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

जयंतरावांची ताकद अबाधित, पण... : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:48 AM

लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांनी राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याशी आघाडी केल्यानंतरच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आ. पाटील यांची ताकद आपला विजय निश्चित करेल, असे शेट्टी यांना वाटत असतानाच पराभवाचा धक्का बसला.

ठळक मुद्देलोकसभेला डिग्रज, तुंग, कवठेपिरानमध्ये धैर्यशील माने यांना मताधिक्य

युनूस शेख ।इस्लामपूर : लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांनी राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याशी आघाडी केल्यानंतरच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र आ. पाटील यांची ताकद आपला विजय निश्चित करेल, असे शेट्टी यांना वाटत असतानाच पराभवाचा धक्का बसला. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आ. पाटील यांची ताकद अबाधित असल्याचे दिसून आले, मात्र शेट्टींना मानणाऱ्या पूर्व भागातील तीन गावात माने यांनी मताधिक्य घेतले.

गेल्या दोन अडीच वर्षांपासून जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात विरोधकांनी धक्के दिले आहेत. इस्लामूपर नगरपालिकेतील सत्तांतर, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळवत विरोधकांनी राष्टÑवादीच्या गोटात खळबळ उडवून दिली होती. या सर्व पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत चुरस अनुभवास आली. कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीची सोबत घेतल्याने गेल्या दोन निवडणुकीत त्यांना मदत करणारे राष्टÑवादी वगळता सर्व पक्ष विरोधात गेले, तर शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविलेल्या माने यांच्याविरोधात स्वाभिमानीसह राष्टÑवादीची ताकद उभी ठाकली.

इस्लामपूर हे मतदारसंघातील सर्वात मोठे मतदारसंख्येचे शहर. येथे आ. पाटील यांची वर्चस्व असतानाही शेट्टींना केवळ २२१७ मतांचे अधिक्य मिळाले. गेल्यावेळेपेक्षा केवळ ४१ जादा मतांची भर पडली. त्यापाठोपाठ आष्टा शहरातही शेट्टींना केवळ ७६२ मताधिक्य मिळाले. तेथे राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे प्राबल्य आहे.रेठरेहरणाक्ष परिसरात राष्टÑवादीसह शेट्टींना मानणाºया कार्यकर्त्यांचा वर्ग आहे. केवळ ७ बुथ असणाºया या गावात शेट्टींनी १७०९ इतके मताधिक्य घेतले.

बोरगावात कॉँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील यांचा गट शेट्टींविरोधात उघडपणे गेला. मात्र तरीही येथे शेट्टींना १००१ मते जादा मिळाली.साखराळेत ९१० जादा मते शेट्टींना मिळाली. वाळव्यात धैर्यशील माने यांना केवळ ३९९ मते जादा मिळाली. बावचीत शेट्टी १४८१ मतांनी पुढे राहिले. बागणीत ५०५, तर अवघे १० बुध असणाºया दुधगावात शेट्टींनी २१४५ मतांची आघाडी घेतली. शिगावात केवळ १८०, तर समडोळीत १५४५ जादा मते शेट्टी यांना मिळाली. कोरेगावात ३५४ चे अधिक्य मिळाले.

मतदारसंघाच्या पूर्व भागातील कवठेपिरान (१७५८), कसबे डिग्रज (८९७) आणि तुंग (२०८) अशी आघाडी धैर्यशील माने यांनी घेतली.मतदारसंघातील मोठ्या १५ गावांपैकी, इस्लामपूर, रेठरेहरणाक्ष, बोरगाव, साखराळे, बावची, आष्टा, बागणी, दुधगाव, कोरेगाव, शिगाव, समडोळी या ११ गावांतून शेट्टी यांना १२ हजार ८०९ मतांचे अधिक्य मिळाले, तर कवठेपिरान, वाळवा, कसबे डिग्रज, तुंगमधून माने यांना ३ हजार ६२ मते जादा मिळाली. गेल्या तुलनेत शेट्टींच्या मताधिक्यात घट झाली.

टॅग्स :PoliticsराजकारणLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालSangliसांगली