शिराळा तालुक्यात राज्य मार्गावर अजब कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:25 IST2021-03-05T04:25:29+5:302021-03-05T04:25:29+5:30
१)०४शिराळा१ फोटो ओळ : चिंचोली (ता. शिराळा) येथे साईड पट्टीतच गटारीचे बांधकाम सुरू आहे. २)०४शिराळा२ फोटो ओळ : चिंचोली ...

शिराळा तालुक्यात राज्य मार्गावर अजब कारभार
१)०४शिराळा१
फोटो ओळ : चिंचोली (ता. शिराळा) येथे साईड पट्टीतच गटारीचे बांधकाम सुरू आहे.
२)०४शिराळा२
फोटो ओळ : चिंचोली (ता. शिराळा) येथे चक्क फरशी पुलाच्या आत गटारीचे बांधकाम करण्यात आले आहे.
३)-०४शिराळा३
फोटो ओळ : पेठ-कोकरूड रस्त्यावर जुन्या फरशी पुलावरच नवीन बांधकाम करून ठेकेदार व अधिकाऱ्यांचा अजब कारभार केला आहे. फोटो
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा तालुक्यातील येथे कऱ्हाड-अनुस्कुरा-मलकापूर व विटा-रत्नागिरी मार्गाच्या कामात अजब कारभार सुरू आहे. फरशी पुलाच्या आतून गटारी, साईड पट्टीत गटारी, तर जुन्या फरशी पुलावर नवीन बांधकाम अशा पद्धतीचा कारभार नेमका कोणाच्या फायद्याचा, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
चिंचोली येथे कऱ्हाड-अनुस्कुरा-मलकापूर मार्गाचे काम सुरू आहे. येथे चक्क फरशी पुलाच्या आतून गटार तसेच साईड पट्टीमधून गटार बांधकाम करण्याचे अजब काम सुरू आहे, तर विटा-रत्नागिरी मार्गावर पेठ-शिराळा-कोकरूड या ठिकाणी सुरू असलेले काम अपघातास निमंत्रण ठरत आहे. या मार्गावरील जुन्या छोटे पुलावरच नवीन पुलाचे कठडे बांधले जात आहे.
विटा, पेठ, मलकापूर, अनुस्कुरा अशा जवळपास १५० किमीच्या रस्त्याचे काम एकाच ठेकेदाराकडे आहे. पन्हाळा सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत १९०.३७ कोटी रुपयांचे काम सुरू आहे. मात्र, पन्हाळ्याहून विटा ते अनुस्कुरापर्यंत येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लक्ष देणे कितपत शक्य आहे हा संशोधनाचा विषय आहे. यामुळे संबंधित ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची तक्रार होत आहे. रस्त्यासाठी करण्यात येणारा मुरूम तसेच खडीचा भराव निकृष्ट दर्जाचा आहे.
या मार्गावरील छोटे फरशी पूल नवीन न करता फक्त वरील दगडी बांधकाम काढून काँक्रीटचे कठडे बांधले आहेत. त्यामुळे रस्त्याखालील पाईप अथवा बांधकाम जुनेच असल्याने ते किती दिवस टिकणार? तर काही असे पूल रस्त्याच्या मार्गाच्या दिशेने न बांधता तिरके आहेत.
चाैकट
कामांकडे लक्ष कोणाचे?
या कामात ठेकेदार व अधिकारी मालामाल होत आहेत. काही ठिकाणी अंतर्गत रस्ते मुख्य रस्त्यास जोडताना व्यवस्थित झाले नाही. यामुळे अंतर्गत रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर वाहने नेताना अपघात होत आहेत. या सर्व कामांकडे कोण लक्ष देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.