शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीत नागरिकांचा रास्ता रोको-विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:38 IST

आटपाडी : आटपाडी येथे सेजल मगर या शाळकरी विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूस जबाबदार घटकांवर करवाई केली ...

ठळक मुद्देजबाबदार घटकांवर कारवाईची प्रशासनाकडून ग्वाही

आटपाडी : आटपाडी येथे सेजल मगर या शाळकरी विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूस जबाबदार घटकांवर करवाई केली जावी, या मागणीसाठी गुरूवारी साई मंदिर चौकात नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी संवाद साधून मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे, तसेच दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सोमवार, दि. २८ जानेवारी रोजी मायाक्कानगरजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत सेजल मगर याचा मृत्यू झाला होता. शहरातील रस्त्याची खुदाई झालेल्या रहदारीच्या ठिकाणची कामे अपूर्ण आहेत, त्यामुळे हा अपघात झाला. यासाठी जबाबदारांवर कारवाईची मागणी करत आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. आर. काटकर, उपअभियंता सुभाष पाटील, पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी चर्चा केली.सेजल मगर याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून रस्ते खुदाई झालेल्या रहदारीच्या ठिकाणाची कामे लवकर पूर्ण करुन वाहतुकीचा अडथळा दूर करण्याची ग्वाही शिष्टमंडळाला देण्यात आली. यानंतर आंदोलन मागे घेतले.

आंदोलनात स्वाभिमानी आघाडीचे नेते भारत पाटील, आनंदराव पाटील, रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र खरात, प्रदीप पाटील, अशोक लवटे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जगताप, मुरलीधर पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते बंडोपंत देशमुख, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डी. एम. पाटील, उत्तम बालटे, अभिमन्यू विभुते, राजाराम हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. ए. पाटील, चंद्रकांत दौंडे, विनायक पाटील, राजेंद्र चव्हाण, दीपक देशमुख, व्ही. एन. देशमुख, कैलास भिंगे, मनोज मरगळे आदी सहभागी झाले होते.राष्टवादीकडून निवेदनरस्ते अपघातातील सेजल मगर याच्या मृत्यूप्रकरणी ट्रकचालक व रस्त्याचे ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आटपाडी शहर अध्यक्ष संभाजीराव पाटील व कार्यकर्त्यांनी लेखी निवेदन तहसीलदार सचिन लंगुटे यांना दिले.

आटपाडी येथे विद्यार्थ्याचा अपघातील मृत्यू झाला असून, त्यास जबाबदार घटकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करुन प्रशासनाचा निषेध केला.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातPoliceपोलिस