तासगावात घरफोड्यांना अटक
By Admin | Updated: January 1, 2015 00:12 IST2014-12-31T22:52:49+5:302015-01-01T00:12:23+5:30
तिघे ताब्यात : पाच जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

तासगावात घरफोड्यांना अटक
तासगाव : तासगाव शहर तसेच उपनगर परिसरात घरफोड्या करणाऱ्या तिघा संशयितांना आज (बुधवारी) तासगाव पोलिसांनी अटक केली. सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. अमित वसंत तोडकर (वय २८), विजय संजय पोतदार (१९) व अजय तानाजी पाटील ऊर्फ नागणे (२३, सर्व रा. वरचे गल्ली, तासगाव) अशी त्यांची नावे आहेत. या तिघांना पाच जानेवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
याबाबत सांगली रस्त्यावरील तेजस शहा यांनी आज तासगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. रात्रीच्यावेळी गस्त सुरू असताना या तिघांना संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार दि. ३० रोजी पहाटे चारच्या दरम्यान सरस्वतीनगर भागात घडला होता.
दि. ११ व १२ डिसेंबर रोजी तेजस शहा यांच्या सांगली रस्त्यावरील दुचाकी शोरूमचे शटर कटावणीने उचकटून त्यातून लॅपटॉप व रोख रक्कम असा ५० हजार ३६० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर पाच घरगुती सिलिंडर, चांदीचा लच्चा, डिव्हीडी प्लेअर असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल व ४० हजारांची दुचाकी जप्त केली. (वार्ताहर)