शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

राज्य शूटिंग बॉलचे कुपवाडला विजेतेपद

By admin | Updated: January 20, 2015 23:49 IST

राज्य महिला शूटिंग बॉल स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला़ अनुभवी कुपवाडने बलाढ्य गोवा संघाचा दणदणीत पराभव करून विजेतेपद पटकावले़

सांगली : विद्युतझोताच्या प्रकाशाने सजलेले क्रीडांगण, जम्पशॉट, डिफेन्स व स्कोप आदी डावांची कौशल्यपूर्ण खेळी, बोचरी थंडी आणि प्रेक्षकांचा उदंड उत्साह अशा जोशपूर्ण वातावरणात राज्य महिला शूटिंग बॉल स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला़ अनुभवी कुपवाडने बलाढ्य गोवा संघाचा दणदणीत पराभव करून विजेतेपद पटकावले़ रात्री आठ वाजता विद्युतझोतात गोवा विरुद्ध कुपवाड अशी अंतिम लढत झाली़ तगड्या खेळाडूंचा भरणा असलेल्या गोवा संघाने पहिल्या सत्रात कुपवाड संघाला धडकी भरवली़ चपळ, चाणाक्ष कुपवाड संघाने कौशल्यपूर्ण खेळाची रणनीती आखून गोव्याला जेरीस आणले़ १५-८ आणि १२-८ अशा सरळ सेटमध्ये गोव्याला नमवून कुपवाडने विजेतेपद आपल्या नावे केले़ विजेत्या कुपवाड संघात नीलिमा कोष्टी (कर्णधार), उज्ज्वला बाडगी, ममता तळगडे, अक्षता म्हेत्रे, राधिका शिंदे, सौज्ञा जगताप, स्नेहा हाक्के आदी खेळाडूंचा समावेश होता़ कुपवाडमधील देशभक्त आर. पी. पाटील विद्यालयाच्या मैदानावर स्पर्धा पार पडल्या़ प्रा. शरद पाटील स्पोर्टस् क्लबने या स्पर्धेचे आयोजन केले होते़ विजेत्या संघांना माजी आ़ प्रा़ शरद पाटील यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले़ राजकुमार पवाळकर यांनी स्वागत केले़ यावेळी स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष शंकर कोकरे, उपाध्यक्ष रमेश पाटील, सचिव नरसगोंडा पाटील, माजी उपमहापौर मोहन जाधव, मुख्याध्यापिका ए़ पी़ फुटाणे, विठ्ठल खोत, नरसीभाई पटेल, अशोक रासकर, प्रमोद पाटील, रजनी कुंभार, शिवाजी कापसे, महादेव सरग, अश्विन पाटील, दत्ताजी जाधव, आदगोंडा गौंडाजे, बापू खांडेकर, शांतिनाथ पाटील, राजू खोत, संजय पाटील, आदी उपस्थित होते.