मिरजेत पोटविकारावरील अत्याधुनिक उपचारपद्धती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:42 IST2020-12-12T04:42:12+5:302020-12-12T04:42:12+5:30
डॉ. सुजय कुलकर्णी यांनी बडोदा (गुजरात) येथील सयाजीराव गायकवाड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमडी मेडीसिन ही पदवी संपादन ...

मिरजेत पोटविकारावरील अत्याधुनिक उपचारपद्धती
डॉ. सुजय कुलकर्णी यांनी बडोदा (गुजरात) येथील सयाजीराव गायकवाड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमडी मेडीसिन ही पदवी संपादन केली. आशियातील सर्वात मोठी पोटविकार संस्था एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलाॅजी, हैदराबाद येथे पद्मभूषण डाॅ. डी. नागेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोटविकार व एंडोस्कोपीची पदवी संपादन केली. या संस्थेत सहा वर्षे पोटविकारतज्ज्ञ म्हणून काम केल्यानंतर डाॅ. सुजय कुलकर्णी यांनी तीन वर्षे एंटेरोस्कोपी (लहान आतड्याची एंडोस्कॉपी) विभागप्रमुख म्हणून काम केले आहे. अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, लिव्हर, पित्ताशय, स्वादुपिंडाच्या आजाराचे एंडोस्कोपीद्धारे निदान व उपचार करण्यात ते तज्ज्ञ आहेत. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय नियतकालिकांत त्यांचे या विषयावर शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. आतापर्यंत त्यांनी सुमारे पंधरा हजारांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत. मिरजेत प्रथमच गॅस्ट्रोएंट्रोलाॅजीतज्ज्ञांची सेवा मिळणार असल्याने रुग्णांची सोय होणार आहे.