शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

एसटीची चाके थांबली; प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:50 PM

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे मंगळवारी जिल्ह्यातील दहा आगारांमधील १७७६ बसेसपैकी केवळ १२ बसेसच्याच फेºया झाल्या. सकाळी नऊनंतर शंभर टक्के बसेस बंद होत्या. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या आंदोलनामुळे दिवसभराचे सुमारे ७० लाखांचे उत्पन्न बुडाले.सांगलीत संप मोडीत काढण्याचा महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडून प्रयत्न ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे मंगळवारी जिल्ह्यातील दहा आगारांमधील १७७६ बसेसपैकी केवळ १२ बसेसच्याच फेºया झाल्या. सकाळी नऊनंतर शंभर टक्के बसेस बंद होत्या. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या आंदोलनामुळे दिवसभराचे सुमारे ७० लाखांचे उत्पन्न बुडाले.सांगलीत संप मोडीत काढण्याचा महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडून प्रयत्न झाला; पण तो सर्वच कामगार संघटनांनी हाणून पाडला. बस स्थानकावरच लागलेली खासगी प्रवासी वाहनेही कर्मचाºयांनी बस स्थानकातून बाहेर काढली.दिवाळीमध्ये एसटी बसेसना प्रचंड गर्दी असते. या कालावधित एसटीकडून हंगामी भाडेवाढही केली जाते. त्यामुळे तुलनेने दिवाळीतील कमाई जास्त असते. पण विविध मागण्यांसाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे सांगली जिल्ह्यातील सर्व आगारांचे मिळून दिवसाला ७० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न बुडणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.सांगलीच्या मुख्य बस स्थानकात प्रवाशांची सकाळी गर्दी झाली होती. मात्र एसटी कर्मचाºयांचा संप असल्याचे लक्षात येताच प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळले. राज्य शासनाच्या आदेशानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी खासगी प्रवासी वाहने थेट बस स्थानकातच आणली. याची माहिती एसटी कामगारांना मिळताच त्यांनी आंदोलनस्थळावरून बस स्थानकाकडे मोर्चा वळविला. खासगी प्रवासी वाहतुकीचा धिक्कार असो, अशा घोषणा देत ही वाहतूक रोखली. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी मध्यस्थी करून वादावर पडदा टाकला. खासगी प्रवासी वाहतूक करणाºयांनी गाड्या बाहेर काढल्या.दुपारी दोनपर्यंत आंदोलन शांततेत सुरू होते. दुपारी दोन वाजता महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे कार्यकर्ते चालक व वाहकाला विनवणी करून एक बस सांगली स्थानकावर घेऊन आले. प्रवासी नसल्यामुळे ही बस थांबूनच होती. तेवढ्यात अन्य सर्व कामगार संघटनांचे कर्मचारी बसजवळ आले व त्यांनी चालकाच्या हातात बांगड्या दिल्या. यावरू वादावादी झाली. ‘तुमच्याकडे पैसे नसतील, तर आम्ही भीक मागून देतो’, असे म्हणून कर्मचाºयांनी पैसे गोळा केले. परंतु, वाहक पैसे न घेता निघून गेला. वाद वाढू नये म्हणून चालक व वाहकाने बस पुन्हा आगारात लावली. त्यानंतर दिवसभर बसेसची जिल्ह्यातील सर्व वाहतूक बंद होती. जिल्ह्यातील एकूण १७७६ बसेसपैकी सकाळी केवळ तासगाव, आटपाडी, कोल्हापूर मार्गावर १२ बसेस धावल्या. त्यानंतर दिवसभर वाहतूक ठप्प होती.संप मोडीत काढण्याचा प्रयत्न नको : बिराज साळुंखेराज्य सरकार, प्रशासन आणि महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडून कर्मचाºयांच्या न्याय्य हक्कांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे. तरीही काही मंडळींनी मंगळवारी संप मोडण्याचा प्रयत्न केला. त्यांना कर्मचाºयांनी चोख उत्तर दिले आहे. याचा विचार करून शासनाने कामगारांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलनाची तीव्रता आणखी वाढविण्यात येईल, असा इशारा संघटनेचे विभागीय अध्यक्ष बिराज साळुंखे यांनी दिला.