शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात कमळाबरोबर गेले घड्याळ, जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 18:50 IST

२५ वर्षांनंतर दिग्गज नेत्यांची थांबली टिकटिक

अशोक पाटीलइस्लामपूर : इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक १९९९ पासून घड्याळ चिन्हावर राज्य करीत होते. त्यांचा राजकीय आलेख आजही चढताच आहे. मात्र, अजित पवार पक्ष आणि घड्याळासह भाजपमध्ये सामील झाल्याने दिग्गज नेत्यांच्या घड्याळाची टिकटिक गेल्या २५ वर्षांनंतर थांबली आहे.राज्यात १९९९ साली शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. तेव्हापासून तत्कालीन मंत्री आमदार जयंत पाटील यांनी पवार यांचे नेतृत्व मानले. राष्ट्रवादी पक्षात विविध पदे भोगताना पक्षातील काहींची पाटील यांना अडथळेही आले. तरी सुद्धा जयंत पाटील यांनी पवार यांच्यावरील आपली निष्ठा ढळू दिली नाही. त्यांना शिराळा मतदारसंघात आमदार मानसिंगराव नाईक यांची साथही मोलाची ठरली.तत्कालीन महाविकास आघाडीच्या राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्तेला त्यांच्याच पक्षातील एकनाथ शिंदे यांनी सुरुंग लावला. तेव्हापासून महाविकास आघाडीतील पक्षांना घरघर लागली. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेऊन राष्ट्रवादीचाच दुसरा गट स्थापन केला. भाजपशी युती करून उपमुख्यमंत्रिपद मिळविले आणि राज्यात स्वत:च्या गटाचे अस्तित्व निर्माण करण्याचा डाव आखला आहे.

राज्यात अजित पवार यांच्या गटाची ताकद वाढवण्यासाठी विविध तालुक्यांत पदाधिकाऱ्यांची नवीन फाैज तैनात करण्यात आली. त्यातच पक्ष आणि चिन्हाच्या वादाचा निकाल अजित पवार यांच्या बाजूने लागल्याने राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर आमदार जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आले आहे. यावर जयंत पाटील आणि मानसिंगराव नाईक यांनी मौन पाळले असले तरी आगामी लोकसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे मानले जात आहे.सध्यातरी दोन दिग्गज नेत्यांच्या घड्याळाची टिकटिक थांबली असली तरी जयंत पाटील यांच्या भूमिकेवर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. दुसरीकडे आमदार मानसिंगराव नाईक यांनीही गेल्या सहा महिन्यांतील राजकीय घडामोडींवर आपण काहीही बोलणार नाही, असा ठाम निर्णय घेतला आहे.जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यातराज्यात अजित पवार यांच्या गटाची ताकद वाढवण्यासाठी विविध तालुक्यात पदाधिकाऱ्यांची नवीन फौज तैनात करण्यात आली. त्यातच पक्ष आणि चिन्हाच्या वादाचा निकाल अजित पवार यांच्या बाजूने लागल्याने राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर आमदार जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आले आहे.

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटील