जत नगरपरिषदेचा दिव्यांग कल्याण निधी खर्च करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:07 IST2020-12-05T05:07:19+5:302020-12-05T05:07:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या आठ वर्षांपासून जत नगरपरिषदेने दिव्यांग कल्याण निधी खर्च केलेला नाही. हा निधी ...

Spend the disability welfare fund of Jat Municipal Council | जत नगरपरिषदेचा दिव्यांग कल्याण निधी खर्च करा

जत नगरपरिषदेचा दिव्यांग कल्याण निधी खर्च करा

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या आठ वर्षांपासून जत नगरपरिषदेने दिव्यांग कल्याण निधी खर्च केलेला नाही. हा निधी खर्च करण्यात यावा, या मागणीसाठी जत येथील दिव्यांगांसह नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

ऐन दिवाळीत नगरपरिषद कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांनी खर्डा-भाकरी खाऊन शिमगा आंदोलन केले, तरीसुद्धा कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. दिव्यांग कल्याण निधी वाटप न झाल्याने तो वाटप करावा यासाठी नगरपरिषदेकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. तरीही निधी न मिळाल्याने प्रलंबित निधी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जत नगरपरिषद प्रशासनावर योग्य ती कारवाई करावी, या मागणीसाठी आंदोलन करत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी दिली.

यावेळी बंडू भाजणवले, राजू वडतीले, विजय ऐनापुरे, गणेश साळे, म्हालाप्पा व्हणमाने, अमोल कांबळे, तुषार कोळी, लियाकत हैदराबादे आदी उपस्थित होते.

------------------

फोटो ०३ सिटी ०२ एडीटोरियल

Web Title: Spend the disability welfare fund of Jat Municipal Council