शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

ईश्वरपूरच्या नामकरणाची विशेष सभा रद्द, शिवसैनिकांचे शक्तीप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 15:02 IST

शिवसेनेचे आनंदराव पवार हे शिवसैनिकांना सोबत घेत शक्तीप्रदर्शन करत नागरिकांनी स्वाक्षरी केलेला दस्तऐवज घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करत सभागृहात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

इस्लामपूर : गेल्या काही दिवसांपासून शहरात गाजत असलेल्या इस्लामपुरचे ईश्वरपूर असे नामकरण करण्याच्या मुद्द्यावर आयोजित विशेष सभा कोरम अभावी रद्द करण्यात आली. या सभेकडे राष्ट्रवादी-अपक्ष आघाडीने पाठ फिरवली तर विकास आघाडीच्या चार सदस्यांनी दांडी मारली.पालिका सभागृहात आज अनेक पक्ष आणि संघटनांनी केलेल्या मागणीनुसार ईश्वरपूर या नामकरणासाठी विशेष सभा घेण्यात आली. नगराध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या उपस्थितीत ही सभा होती.शिवसेनेचे आनंदराव पवार हे शिवसैनिकांना सोबत घेत शक्तीप्रदर्शन करत नागरिकांनी स्वाक्षरी केलेला दस्तऐवज घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करत सभागृहात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.सभेचे कामकाज सुरू होण्यासाठी कायद्यानुसार १५ सदस्य उपस्थित असणे बंधनकारक असते. आजच्या सभेला ३२ पैकी केवळ १० सदस्य उपस्थित होते. त्यामुळे गणपूर्ती होत नसल्याने ही सभा रद्द करण्यात आल्याचे नगराध्यक्ष पाटील यांनी जाहीर केले. शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी विकास आघाडीचे अमित ओसवाल, चेतन शिंदे, अन्नपूर्णा फल्ले यांच्यासह कोमल बनसोडे यासुद्धा सभेला अनुपस्थित राहिल्या होत्या.शिवसेनेचे आनंदराव पवार म्हणाले, आज शहराच्या दृष्टीने महत्वाचा दिवस होता. शहराचे नाव ईश्वरपूर करावे अशी इच्छा या शहरातील बारा-बलुतेदार समाजबांधवांनी व्यक्त केली आहे.या मागणीला जवळपास ३५ हजार नागरिकांनी स्वाक्षरी करून पाठिंबा दिला आहे. आज जे सदस्य गैरहजर आहेत त्यांनी या जनतेचा अवमान केला आहे. त्यांना ही जनता त्यांची जागा दाखवून देईल.नगराध्यक्ष पाटील म्हणाले, जनतेने निवडून दिलेल्या सदस्यांनी सभागृहात येऊन आपली भूमिका मांडायला हवी होती.मात्र गणपूर्तीअभावी ही सभा रद्द करत आहे. पुढील सभा २७ डिसेंबरला याच आणि इतर विषयांवर होईल असे त्यांनी जाहीर केले.आजच्या सभेला पवार यांच्यासह विक्रम पाटील, वैभव पवार, शकील सय्यद, प्रदीप लोहार, सीमा पवार, सुप्रिया पाटील, प्रतिभा शिंदे आणि मंगल शिंगण उपस्थित होत्या.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरShiv Senaशिवसेना