शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सोनसळमधील दोघा भावंडांना मिळणार संगोपन भत्ता, शासकीय नोकरी; सिलिंडरच्या स्फोटामुळे बनले होते निराधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 13:28 IST

'सिलिंडरच्या स्फोटामुळे दोघे निराधार, सोबतीला अंधार' या मथळ्याखाली 'लोकमत'ने दि. १ डिसेंबर २०२२ रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते.

सांगली : सोनसळ (ता. कडेगाव) येथील सोनाली कदम आणि अभिराज कदम या दोघा निराधारांना केंद्र शासनाच्या आदेशानुसार शासकीय मदत देण्याची कार्यवाही चालू आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी दोन्ही मुलांना महिन्याला संगोपन भत्ता आणि नोकरी, शिक्षणात एक टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. यासाठीचा अनाथ प्रमाणपत्राचा प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे.'सिलिंडरच्या स्फोटामुळे दोघे निराधार, सोबतीला अंधार' या मथळ्याखाली 'लोकमत'ने दि. १ डिसेंबर २०२२ रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. चार महिन्यांपूर्वी घरगुती सिलिंडरचा स्फोट होऊन पती, पत्नीसह त्यांची दोन मुले जखमी झाली. जखमी मुलांची आई ज्योती अंकुश कदम यांचे उपचारावेळी निधन झाले, त्यानंतर दहा दिवसांत वडील अंकुश यांचेही निधन झाले.

जवळचे कुणी नातेवाईक नसल्याने आता शेजारच्या लोकांनी माणुसकीचे दर्शन घडवत पोटा-पाण्याची व्यवस्था केली, पण त्यांच्या भविष्याचा प्रश्न अद्याप अधांतरीच आहे. या मुलांवर वैद्यकीय उपचार होण्याची गरज असून, त्यांचे शिक्षणही चालू राहिले पाहिजे. या प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते विश्राम कदम यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडे मदतीची याचिका दाखल केली होती. यावर तातडीने सुनावणी होऊन राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने सांगली जिल्हाधिकारी यांना मदत करण्याची सूचना केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी तातडीने मदतीसाठी जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. एच. बेंद्रे यांनी बालसंगोपन योजनेंतर्गत या अनाथ बालकांना त्यांचे शिक्षण व संगोपन याकरिता दरमहा ११०० रुपये प्रती मुलास मिळणार आहेत. दोन्ही बालकांना शिक्षण व नोकरीमध्ये १ टक्के आरक्षणाचा लाभ देणार आहे. यासाठी बालकांना अनाथ प्रमाणपत्र मिळणेबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करणार आहे, असेही बेंद्रे यांनी सांगितले.वैद्यकीय उपचार, शिक्षणासाठी ठोस मदतीची गरजसोनाली आणि अभिराज या दोघा निराधारांना शासकीय मदत मिळणार आहे; पण ती मदत तुटपुंजी असल्यामुळे त्यांचा वैद्यकीय खर्च आणि शिक्षण, संगोपनासाठी मोठा खर्च येणार आहे. यासाठी ठोस मदतीची गरज असून, दानशुरांनी पुढे येण्याची गरज आहे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विश्राम कदम यांनी केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीfireआगDeathमृत्यू