‘सोनहिरा’चे रोलर पूजन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST2021-06-16T04:35:26+5:302021-06-16T04:35:26+5:30

ओळ : वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यात संचालक रघुनाथराव कदम यांच्याहस्ते रोलर पूजन ...

‘Sonhira’s’ roller worship in excitement | ‘सोनहिरा’चे रोलर पूजन उत्साहात

‘सोनहिरा’चे रोलर पूजन उत्साहात

ओळ :

वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यात संचालक रघुनाथराव कदम यांच्याहस्ते रोलर पूजन करण्यात आले. यावेळी जगन्नाथ माळी, पंढरीनाथ घाडगे, शिवाजीराव काळेबाग, शरद कदम आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे २०२१-२०२२ गळीत हंगामातील मिल रोलर पूजन व प्रतिष्ठापना कार्यक्रम उत्साहात पार पडला. संचालक व शेती कमिटीचे अध्यक्ष रघुनाथराव कदम यांच्याहस्ते सत्यनारायण पूजा व रोलर पूजन करण्यात आले.

कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव महिंद, संचालक निवृत्ती जगदाळे, बापूसाहेब पाटील, प्रभाकर जाधव, युवराज कदम, दिलीपराव सूर्यवंशी, सयाजी पाटील उपस्थित होते.

रघुनाथराव कदम म्हणाले की, येत्या हंगामातील गाळपाच्यादृष्टीने सर्व यंत्रसामग्रीची कामे सुरू आहेत. ऊस तोडणी-वाहतूक करार सुरू आहेत. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांनी कारखान्याकडे नोंद केलेला ऊस गाळपास कारखान्याकडे पाठवून योग्य सहकार्य करावे. आपणा सर्वांचे सहकार्य व चांगले योगदान लाभल्यामुळे संस्थेचे नाव राज्यात व देशात झाले आहे. त्यामुळे आपल्या कारखान्यास राज्यस्तरीय व देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचे मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याचा आपणा सर्वांना सार्थ अभिमान आहे.

यावेळी कारखान्याचे संचालक जगन्नाथ माळी, पंढरीनाथ घाडगे, शिवाजीराव काळेबाग, कार्यकारी संचालक शरद कदम आदींसह सभासद शेतकरी, खातेप्रमुख, विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: ‘Sonhira’s’ roller worship in excitement