शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तो मी नव्हेच... घरात घुसून सशस्त्र धिंगाणा, ‘सदाभाऊं’च्या मुलाचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 05:29 IST

‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यास तलवारीने मारण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यात माने यांनी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर (सांगली) : पूरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चात आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केल्याच्या रागातून त्यांचा मुलगा सागर याने साथीदारांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष रविकिरण माने (३५) यांना घरात घुसून शस्त्रांचा धाक दाखवत मारहाण, शिवीगाळ केली. हा प्रकार सोमवारी रात्री तांबवे (ता. वाळवा) येथे घडला. कासेगाव पोलिसांनी सागर सदाभाऊ खोत, अभिजित भांबुरे, स्वप्निल सूर्यवंशी आणि सत्यजित कदम या चौघांवर गुन्हा नोंद केला आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यात माने यांनी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली होती.माने सोमवारी रात्री कुटुंबासोबत घरी जेवण करत होते. त्यावेळी सागर खोत साथीदारांसह चाकू, गुप्ती, तलवार अशी प्राणघातक हत्यारे घेऊन माने यांच्या घरात घुसला. ‘तू सदाभाऊंवर टीका करतोस का, तुला मस्ती आली आहे का’, असे म्हणत त्याने माने यांच्यावर हल्ला चढवला. कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्याने या चौघांनी मोटारीतून तेथून पोबारा केला.  

मी घटनास्थळी नव्हतोच - सागर खोतया घटनेशी आपला काही संबंध नाही. मी घटनास्थळी नव्हतो. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासावे. रविकिरण माने हा आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर नेहमी एकेरी भाषेत आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करतो. कदाचित त्याचा जाब विचारण्यासाठी आमचे कार्यकर्ते गेले असतील. मात्र तेथेही माने यानेच त्यांच्याशी उद्धट वर्तन केले आहे, असा खुलासा सागर खोत याने केला.

 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत FarmerशेतकरीSangliसांगली