शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडी सरकारवर काही सत्ताधारी आमदारच नाराज, तर काही समाधानी; सांगली जिल्ह्यातील स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 17:26 IST

एकीकडे सरकारच्या कामगिरीवर विरोधी पक्षाचे आमदार टीका करीत असताना आता सत्ताधारी आमदारांनीही तसाच सूर ओढण्यास सुरुवात केली आहे.

सांगली : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन अडीच वर्षे होत आली आहेत. या सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेनाकाँग्रेसच्या आमदारांमध्ये सरकारच्या कामकाजावरुन समन्वय नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे, मात्र सत्ताधारी आमदारच सरकारच्या कामगिरीवर खूश नसल्याची बाब समोर येत आहे. आमदारांच्या मतदारसंघातील कामे होत नसल्याच्या तक्रारी प्रामुख्याने केल्या जात आहेत.  सांगली जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष मानला जातो. त्यानंतर काँग्रेस, भाजप व शिवसेनेचा क्रमांक लागतो. जिल्ह्यात अपक्ष एकही आमदार नाही. एकीकडे सरकारच्या कामगिरीवर विरोधी पक्षाचे आमदार टीका करीत असताना आता सत्ताधारी आमदारांनीही तसाच सूर ओढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातही अशीच स्थिती दिसते.सरकारच्या कामगिरीवर सत्ताधारी आमदार समाधानी आहेत का?काँग्रेसविश्वजित कदम : कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी मतदारसंघाला विकासाचे रोल मॉडेल केल्याचे सांगितले आहे.  विक्रम सावंत : मतदारसंघातील कामे प्राधान्याने व्हायला हवीत. येथील पाणीप्रश्न महत्त्वाचा असल्याने त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. प्रतिव्यक्ती जमीनधारणेत सर्वात मोठा तालुका असूनही जतच्या योजनांकडे दुर्लक्ष होत आहे, असे सावंत म्हणाले.राष्ट्रवादीजयंत पाटील : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.मानसिंगराव नाईक : शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले की, तालुक्यातील सर्व महत्त्वाची कामे महाविकास आघाडी सरकारमुळे मार्गी लागली आहेत. मतदारसंघातील कामे प्राधान्याने पूर्ण झाली. कुठेही अडचणी आल्या नाहीत.सुमनताई पाटील : राज्य सरकारच्या एकूणच कामगिरीबाबत मी समाधानी आहे. आम्ही सुचविलेली अनेक कामे मंजूर होतात, असे तासगाव-कवठेमहांकाळच्या आ. सुमनताई पाटील यांनी सांगितले.शिवसेनाअनिल बाबर :  खानापूर मतदारसंघातील कामे होत नसल्याबाबत बाबर यांनी पक्षीय नेत्यांकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र याबाबत त्यांनी मत व्यक्त केले नाही.

नेमक्या काय आहेत तक्रारी...

  • प्रस्ताव पडून : शिवसेना, काँग्रेस हे मित्रपक्ष असूनही त्यांच्या आमदारांनी दिलेले प्रस्ताव शासनदरबारी तसेच पडून आहेत.
  • कुरघोड्यांचे राजकारण : मित्रपक्ष असूनही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून कुरघोड्या केल्या जात असल्याचे शिवसेना, काँग्रेस पदाधिकारी सांगतात.
  • श्रेय लाटले जाते : एखादे काम शिवसेना, काँग्रेस आमदारांनी केले, तर त्याचे श्रेय राष्ट्रवादीचे लोक घेत आहेत.
टॅग्स :SangliसांगलीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना