प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणार : दिनकर खरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:29 IST2021-09-22T04:29:12+5:302021-09-22T04:29:12+5:30
संख : जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावू, असे प्रतिपादन जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दिनकर खरात ...

प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणार : दिनकर खरात
संख : जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावू, असे प्रतिपादन जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दिनकर खरात यांनी केले.
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत खरात यांनी पंचायत समितीमध्ये बैठक आयाेजित केली हाेती. बैठकीमध्ये शिक्षकांनी वरिष्ठ वेतन श्रेणी, सेवापुस्तके अद्ययावत करणे, शालेय विद्युतीकरण, शंभर टक्के शाळा भरविणे व शाळांच्या वेळा, शिक्षकांच्या अडी-अडचणी तसेच शाळांच्याबाबतीत प्रश्न उपस्थित केले.
यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मांडले. बैठकीत वरिष्ठ वेतन श्रेणी, सेवा पुस्तके अद्ययावत करणे, शालेय विद्युतीकरण, शाळा किरकोळ दुरुस्ती व मोठी दुरुस्ती, आदर्श शिक्षक पुरस्कार, रुग्ण कल्याण समितीवर प्राथमिक शिक्षकांचा सदस्य घेण्यासंदर्भात पत्रव्यवहार करणे, शंभर टक्के शाळा भरवणे व शाळांच्या वेळा, आयकर व सीएमपी प्रणालीसंदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी विस्तार अधिकारी तानाजी गवारे, सुखदेव वायदंडे, लिपिक व कर्मचारी युनियनचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू कांबळे, लिपिक व कर्मचारी युनियनचे तालुका अध्यक्ष संतोष गुरव, बीआरसीचे तज्ज्ञ मार्गदर्शक सुरेंद्र सरनाईक, मुल्ला व सर्व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.