सांगली : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत जत शहराच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पासाठी जत येथील गट नंबर २२/१ मधील दोन हेक्टर क्षेत्र जमीन प्रदान करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्याकडे सुपूर्द केला.जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी या जागेचे बाजारमूल्यानुसार होणारे मूल्यांकन १५ लाख २९ हजार रुपये तहसीलदार जत यांच्यामार्फत चलनाने शासनाला जमा करणे अनिवार्य असल्याचे आदेशात नमूद केले आहे. आदेश मिळाल्यापासून एका महिन्याच्या आत हस्तांतरित जमिनीस कुंपण घालणे किंवा संरक्षक भिंत बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच संबंधित जमिनीमधील गौण खनिजावरील सर्व अधिकार शासनाने राखून ठेवले आहेत, असे आदेशात म्हणण्यात आले आहे.जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना जमीन प्रदान करण्यात आली. यावेळी तहसीलदार अमोल कुंभार, नगरपरिषद प्रशासन विभागाचे सह आयुक्त दत्तात्रय लांघी यांच्यासह इतर उपस्थित होते.जागेचा उपयोग काय होणार?जत नगरपरिषदेसाठी ही जागा कचरा प्रक्रिया केंद्र, प्रक्रिया केलेल्या कचऱ्याच्या साठवणीसाठी केंद्र, घनकचऱ्याच्या वाहतूक करणाऱ्या घंटागाड्या, ट्रॅक्टर-ट्रॉली, जेसीबी, मैला वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळ, मृत प्राणी दफनभूमी, भटकी कुत्री निरुपद्रवीकरण केंद्र, तसेच बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन केंद्र म्हणून वापरली जाणार आहे.
Web Summary : Jat city secured two hectares for a solid waste management project under the Swachh Maharashtra Abhiyan. The land will house a waste processing center, vehicle parking, and animal management facilities, improving sanitation.
Web Summary : स्वच्छ महाराष्ट्र अभियान के तहत जत शहर को ठोस अपशिष्ट प्रबंधन परियोजना के लिए दो हेक्टेयर भूमि मिली। इस भूमि पर अपशिष्ट प्रसंस्करण केंद्र, वाहन पार्किंग और पशु प्रबंधन सुविधाएँ होंगी, जिससे स्वच्छता में सुधार होगा।